पाटणमध्ये भातासह नाचणीची पुनर्लागण

patan
patan

पाटण (जि. सातारा) ः मॉन्सूनच्या दमदार पावसाचे आगमन झाल्यामुळे भात व नाचणीच्या पुनर्लागणीस शेतकरी लागला आहे. तालुक्‍याच्या पश्‍चिम भागातील डोंगर उतार व हलक्‍या प्रतीच्या जमिनीत शेतकऱ्यांनी नाचणीच्या लागवडीस सुरुवात केली आहे. हलक्‍या स्वरूपात पडणाऱ्या पावसाच्या सरी नाचणी लागणीसाठी उपयुक्त असल्याने नाचणीच्या पुनर्लागणीस वेग आला आहे. 

दडी मारलेला मॉन्सूनचा पाऊस बेंदूर सणादिवशी सक्रिय झाला. त्याच दिवशी दिवसभर पावसाच्या सरी कोसळत होत्या. मात्र, रविवारपासून (ता. 5) पावसाचा जोर पुन्हा कमी झाला आहे. रिमझिम पावसाच्या सरी पडत असल्याने तालुक्‍याच्या पश्‍चिम भागात डोंगर उतारावर व हलक्‍या स्वरूपाच्या जमिनीवर नाचणीची पुनर्लागण केली जाते. नाचणीचे तरू उपटल्यानंतर ते फक्त ठराविक अंतरावर टाकले जाते. 

तरू टाकल्यानंतर थोडा पाऊस झाला, तरी नाचणीचे तरू जगून निघते. भाताच्या लावणीसाठी अजून पावसाची गरज असून, पडत असलेला पाऊस नाचणीच्या पुनर्लागणीसाठी योग्य असल्याने भात लावणीची कामे पाठीमागे ठेऊन शेतकरी नाचणी लागवडीत व्यस्त असलेला पाहावयास मिळत आहे. पावसाच्या हलक्‍या सरी कोसळत असल्याने नाचणी लागणीस वेग आला असून, नाचणी लागणीनंतर शेतकरी भात लावणीकडे लक्ष देईल. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com