सातारा : रिक्षाचालकाचा प्रामाणिकपणा; महिलेची लाखाचा ऐवज असलेली पर्स केली परत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सातारा : रिक्षाचालकाचा प्रामाणिकपणा; महिलेची लाखाचा ऐवज असलेली पर्स केली परत

सातारा : रिक्षाचालकाचा प्रामाणिकपणा; महिलेची लाखाचा ऐवज असलेली पर्स केली परत

sakal_logo
By
भद्रेश भाटे

सातारा (वाई) : रिक्षामध्ये विसरलेली सुमारे एक लाख रुपयांचा ऐवज असलेली पर्स संबंधित प्रवासी महिलेला प्रामाणिकपणे परत करून येथील रविवार पेठेतील रिक्षाचालकाने आदर्श ठेवला. प्रकाश रामचंद्र ढगे असे रिक्षाचालकाचे नाव आहे.

याबाबतची माहिती अशी, सुषमा मालुसरे (मुंबई) या बुधवारी (ता.१०) साडेपाचच्या सुमारास सिद्धनाथवाडी येथून रिक्षा (क्र. एमएच १ सीजे ०३१२) करून मालकमपेठ (पसरणी) येथील भावाच्या घरी गेल्या होत्या. यावेळी त्यांची पर्स रिक्षामध्येच विसरली. स्टॉपवर आल्यावर रिक्षामध्ये पर्स पडल्याचे ढगे यांच्या निदर्शनास आले. सापडलेली पर्स नेमकी कोणाची, हे त्यांना समजून येत नव्हते. त्यावर त्यांनी रमेश घोलप या मित्राला सोबत जाऊन वाई पोलिस ठाण्यात ठाणे अंमलदार सौ. एस. एस. मुजावर यांच्याकडे पर्स सुपूर्त केली. या पर्समध्ये सोन्याची दोन नेकलेस, कानातील वेल, नथ तसेच मोबाईल व रोख रक्कम होती. पर्स गहाळ झाल्याचे लक्षात आल्यानंतर मालुसरे व नातेवाईकांनी रिक्षा स्टॉपवर जाऊन चौकशी केली. मात्र, काही तपास लागला नाही.

हेही वाचा: "मूठभर लोकं देशभक्त मुसलमानांना बदनाम करताय"

दरम्यान, पोलिस ठाण्यात आल्यानंतर पोलिसांच्या समक्ष खात्री पटवून त्यांच्याकडे पर्स सुपूर्त केली. यावेळी महिला हवालदार रेखा तांबे व श्रावण राठोड उपस्थित होते. रिक्षाचालकाने दाखवलेल्या प्रमाणिकपणाचे पोलिस निरीक्षक बाळासाहेब भरणे यांनी कौतुक केले

loading image
go to top