सातारा : सैनिक फेडरेशन दहा हजार झाडे लावणार ; सावंत

जागतिक तापमान वाढीमुळे निसर्ग चक्र धोक्‍यात आले
ब्रिगेडिअर सुधीर सावंत
ब्रिगेडिअर सुधीर सावंत sakal

सातारा : जागतिक तापमान वाढीमुळे निसर्ग चक्र धोक्‍यात आले असून, त्‍याचे परिणाम मानवी जीवनावर होत आहेत. हे परिणाम कमी करण्‍यासाठी सैनिक फेडरेशनने येणाऱ्या पावसाळ्यात राज्‍यव्‍यापी वृक्षारोपण आणि संगोपनाची मोहीम राबविण्‍याचा निर्णय घेतला आहे. यानुसार जिल्ह्यात १० हजार झाडे लावण्‍यात येणार असल्‍याची माहिती माजी खासदार आणि निवृत्त ब्रिगेडिअर सुधीर सावंत यांनी येथील पत्रकार परिषदेत दिली.

या वेळी फेडरेशनचे सूर्यकांत पडवळ, डॉ. संजय लावंड, डॉ. रमेश शिंदे, शत्रुघ्न महामुलकर, विलास जगताप, अंकुश चव्‍हाण, संजय निंबाळकर, सुधीर बेलोशे, समाधान निकम, प्रवीण शिंदे, सचिन पोळ, मनोज भुजबळ आदी पदाधिकारी उपस्‍थित होते. श्री. सावंत म्‍हणाले, ‘‘तापमान वाढ आणि पर्यावरण हा जागतिक पातळीवरील संवेदनशील विषय बनून राहिला आहे. दिवसेंदिवस तापमान वाढत असून, त्‍यामुळे हिमशिखरे वितळण्‍याच्‍या प्रमाणात वाढ होत आहे. यामुळे अनेक भागांत नैसर्गिक संकटांचा सामना दररोज मानवाला करावा लागत आहे.

यासाठी सैनिक फेडरेशनने राज्‍यस्‍तरीय वृक्षारोपण आणि संगोपनाचा निर्णय घेतला आहे. तालुकास्‍तरावर जागा निवडून त्‍याठिकाणी शाळा, महाविद्यालये, सामाजिक संस्‍था, प्रशासकीय यंत्रणेच्‍या मदतीने रोपण करण्‍यात येणार आहे. यासाठीची बैठक जिल्‍हाधिकारी शेखर सिंह, वन विभागाचे महादेव मोहिते यांच्‍यासमवेत होत आहेत. शासनाकडून यासाठीची रोपे पुरविण्‍यात येणार आहेत. ही रोपे लावल्‍यानंतर त्‍यांच्‍या संगोपनाची जबाबदारी त्‍या- त्‍या भागातील माजी सैनिक, तसेच स्‍वयंसेवी संस्‍था, युवकांकडे देण्‍यात येणार आहे. लावलेली सर्व झाडे जगावीत, यासाठीची कार्यपद्धती आम्‍ही ठरवली असून,त्‍यानुसारच त्‍याची अंमलबजावणी होईल.’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com