शेणोलीत लांडगा आले रे आला सारखी परिस्थिती; सरपंच संतापले

शेणोलीत लांडगा आले रे आला सारखी परिस्थिती; सरपंच संतापले

कऱ्हाड ः प्रशासकीय पातळीवर शेणोली किंवा शेणोली स्टेशन येथे कोरोनाचा रुग्ण सापडल्याची माहिती माध्यमांना दिली जात आहे. मात्र, वास्तविक शेणोली किंवा शेणोली स्टेशनमध्ये एकही रुग्ण सापडलेला नाही. मात्र, प्रशासनाकडूनच चुकीची माहिती दिली गेल्याने ग्रामस्थांत घबराट आहे. त्यामुळे प्रशासकीय पातळीवर त्याचा शासनाने त्वरित खुलासा करावा, अशी मागणी शेणोलीचे सरपंच सतीश कणसे यांनी निवेदनाव्दारे केली आहे.

ही पहा माणुसकीची झलक; जाणत्यांच्या डोळ्यात अंजन घालणारी
 
दोन ते तीन दिवसांपासून शेणोली किंवा शेणोली स्टेशन येथे कोरोनाचा रुग्ण सापडल्याचे वृत्त माध्यमांतून येत आहे. मात्र, वास्तविक शेणोली गावात एकही रुग्ण नाही. आजअखेर तेथे संशयितही रुग्ण सापडलेला नाही. शेजारील गावात रुग्ण आहे. मात्र, प्रशासकीय पातळीवर शेणोली किंवा शेणोली स्टेशनचे नाव सांगितले जात आहे, ते चुकीचे आहे. शेणोली स्टेशन शेणोली गावचाच भाग आहे. त्यामुळे त्याचा खुलासा शासनाने करावा.

शेणोलीचे नाव आल्याने भागातील ग्रामस्थांत भीतीचे वातावरण आहे. गावातील सार्वजनिक सेवाही बंद पडल्या आहेत. एकही रुग्ण नसतानाही गाव अत्यावश्‍यक सेवांपासूही विनाकारण वंचित राहत आहे. त्यामुळे प्रशासनाने आता त्याचा सोक्षमोक्ष लावावा. 

शेतकऱ्यांची मागणी पुर्ण; 'या' धरणातून उद्या पाणी साेडले जाणार

कोरोनाच्या धास्तीने आटतोय मायेचा झरा?; तासाभरात होताहेत अंत्यसंस्कार

गृहिणींसाठी महत्वपुर्ण बातमी; साडे चार लाख ग्राहकांना लाभ कंपनीचा दावा

काेराेनाच्या काळात जलमंदिर पॅलेस येथून जनेतची सेवा करण्यात मग्न असलेले खासदार उदयनराजे भाेसले अचनाक संतापले. काय आहे त्यांच्या संतापाचे कारण नेमके कारण वाचा सविस्तर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com