Satara : दोन शाळकरी मुलांची साताऱ्यात आत्महत्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 suicide

Satara : दोन शाळकरी मुलांची साताऱ्यात आत्महत्या

सातारा : शहरातील आठवीत शिकणाऱ्या दोन शाळकरी मुलांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार आज समोर आला आहे. दोघांच्या आत्महत्येचे कारण अद्याप समोर आले नाही. पोलिस याबाबत तपास करत आहेत.

अथर्व बसवराज दोडमणी (वय १४, रा. सह्याद्री पार्क, शाहूपुरी) व जितेंद्र जगन वासकळे (वय १५, रा. चंदननगर, कोडोली) अशी आत्महत्या केलेल्या शाळकरी मुलांची नावे आहेत.

जितेंद्र हा शहरातील एका शाळेत इयत्ता आठवीमध्ये शिकत होता. काल रात्री जेवण झाल्यानंतर त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. रात्री साडेअकराच्या सुमारास हा प्रकार कुटुंबीयांना समजला. त्यांनी त्याला तातडीने उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.