लॉकडाउनमध्ये शाळकरी मुग्धाने बनविले 500 सीडबॉल

patan
patan

तारळे : लॉकडाउनमधील मोकळा वेळ घालवायचा कुठे, असा प्रश्न सर्वांसमोरच पडला होता. खासकरून शाळकरी मुलांसमोर वेळेचा सदुपयोग कसा करायचा, असा प्रश्न होता. कुणी अभ्यास केला, कुणी वाचन केले, कुणी नवनवीन कल्पना राबविण्याचा प्रयत्न केला. असाच एक चिमुकला प्रयत्न येथील 12 वर्षीय मुग्धाने केला. पर्यावरण संवर्धन करण्याच्या उद्देशाने 500 सीडबॉल करून ते डोंगरात विविध ठिकाणी टाकून पर्यावरणाला हातभार लावण्याच्या तिच्या कृतीचे कौतुक होत आहे. 

शाळेत हुशार, चुणचुणीत असलेली मुग्धा सचिन वागडोळे ही सातवीत शिकते. गत महिन्यात उपक्रमशील शिक्षक दीपक मगर यांनी तिला सहज "सुटीत काय करतेस,' असे विचारून सीडबॉलची कल्पना सांगितली. त्यापासून पर्यावरण संवर्धन करण्यासाठी आपणही प्रयत्न करावा, असे तिने मनोमन ठरविले. लगेचच 500 सीडबॉल करण्याचे ध्येय ठरवून कामाला लागली. 

सकाळी उन्हाच्या आत रानावनात जाऊन बिया गोळा करायच्या अन्‌ घरी आल्यावर मातीचे गोळे बनवून त्यात बिया टाकून बॉल बनवायचे, असे आठ दिवस तिने काम केले. कडूनिंब, शेवगा, आंबा, करंज आदी प्रकरच्या बिया घालून सुमारे 550 सीडबॉल तयार केले. या कामात तिला आजी उषा, आई कीर्ती, वडील सचिन, भाऊ साहिल, काका, काकी व पूर्वी यांची मदत झाली. नुकतीच या सीडबॉलमधून अंकुर फुटू लागले असून पावसाला सुरवात झाली की मोठ्यांच्या मदतीने ते सीडबॉल ती डोंगरात सोडून येणार आहे. 


दीपक गुरुजींनी संकल्पना दिली. घरच्यांनी प्रोत्साहन दिले, म्हणून पर्यावरण रक्षणासाठी सीडबॉल बनविता आले. हे करताना विलक्षण आनंदही मिळाला. 

- मुग्धा वागडोळे, तारळे 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com