शिंगणापूरकरांना "महादेव' भेटला अन्‌..!

man
man

गोंदवले (जि. सातारा) : आषाढी एकादशीच्या निमित्ताने शिंगणापूरकरांना "महादेव' भेटला अन्‌ गरजू कुटुंबांच्या उपवासाचा प्रश्न मिटला. या निमित्ताने शिखर शिंगणापुरातील सुमारे 350 कुटुंबांच्या चेहऱ्यावर विठ्ठल भेटल्याचा आनंद पाहायला मिळाला.
 
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या तीन महिन्यांपासून जनजीवन विस्कळित झाले आहे. सर्वच व्यवहार ठप्प झाल्याने लोकांना आर्थिक विवंचना भेडसावत आहे. त्यातही अगदी हातावर पोट असणाऱ्या लोकांची अवस्था खूपच बिकट झाली आहे. शासनाने हळूहळू अनलॉक सुरू केले असले, तरी सर्वसामान्यांची आर्थिक गाडी रुळावर येण्यासाठी वेळ लागणार आहे. याच पार्श्वभूमीवर लोक हात राखूनच खर्च करत आहेत. 

आषाढी एकादशीवरदेखील त्याचा परिणाम दिसून आला. अनेक भाविकांची उपवासाची अडचण शिखर शिंगणापुरातीलच; परंतु धरावीत स्थायिक असलेल्या महादेव शिंदे यांच्या लक्षात आली. हा प्रश्न सोडविण्यासाठी संजय पवार यांनी मांडलेल्या संकल्पनेनुसार गरजू कुटुंबांची ही अडचण सोडविण्याचा निर्णय घेण्यात आला. सामाजिक कार्यकर्ते वीरभद्र कावडे, अविनाश दोशी यांच्यासह पैलवान किरण भगत यांनीही याकामी आर्थिक भार उचलला आणि गावातील साडेतीनशेहून अधिक कुटुंबांना उपवासाच्या पदार्थांसह केळीवाटप करण्यात आले. 

या वेळी दीपकराव तंडे-बडवे, बाळासाहेब भोसले, सचिन पवार, बाळासाहेब पवार, संजय पवार, सोमनाथ पवार, शंभू मुळीक, उमेश पवार, दादासाहेब पवार, शंकर पवार, ऋषिकेश पवार, ऋषिकेश साळुंखे, पांडुरंग खंदारे, विठ्ठल पवार उपस्थित होते. 

आषाढी एकादशीदिवशी उपवासाचे पदार्थ घरपोच मिळाल्याने आम्हाला विठ्ठल भेटल्याचे समाधान मिळाले. 

- हभप बाळासाहेब महाराज, वारकरी, शिखर शिंगणापूर 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com