सातारा : शिवसेना कार्यालयाला कुलूप; जिल्ह्यातील प्रमुख 5 नेते पदाधिकाऱ्यांसह गायब

Satara Shiv Sena office
Satara Shiv Sena officeesakal
Summary

आज सकाळपासून शिवसेना शहर कार्यालयाला कुलूप लावल्याचं कळतंय.

सातारा : महाराष्ट्रात विधानपरिषद निवडणुकीनंतर राज्यात सत्तेत असलेल्या शिवसेनेत (Shiv Sena) फुट पडण्याची शक्यता आहे. एकीकडं पक्षाचे वरिष्ठ नेते पराभवाच्या कारणांवर विचारमंथन करत आहेत, तर काही नेते ‘नॉट रिचेबल’ आहेत.

पक्षाच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे सोमवारी सायंकाळपासून संपर्कात नाहीयत. शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे 17 आमदार देखील असल्याची माहिती आहे. या शिवाय, साताऱ्यातील शिवसेना कार्यालयाला कुलूप लागल्याचं कळत असून जिल्ह्यातील शिवसेनेचे प्रमुख 5 नेते पदाधिकाऱ्यांसह गायब असल्याचं समजतंय. दरम्यान, मंत्री एकनाथ शिंदे यांचे कट्टर समर्थक शिवसेना शहर प्रमुख नीलेश मोरे, उप शहर प्रमुख गणेश अहिवळे हे देखील नॉट रिचेबल असून आज सकाळपासून शिवसेना शहर कार्यालयाला कुलूप लावल्याचं कळतंय.

Satara Shiv Sena office
महाराष्ट्रात लवकरच देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात सरकार; भाजप आमदाराचं सूचक वक्तव्य

शिवसेनेचे कोणते आमदार नॉट रिचेबल?

एकनाथ शिंदे, शंभूराज देसाई, तानाजी सावंत, चंद्रकांत पाटील (अपक्ष), संजय राठोड, प्रताप सरनाईक, राजन साळवी, योगेश कदम, प्रकाश सुर्वे, बालाजी किणीकर, महेंद्र दळवी, भरत गोगावले, महेंद्र थोरवे, अब्दुल सत्तार, संजय शिरसाठ, रमेश बोरनारे, विश्वनाथ भोईर यांच्यासह आणखी काही आमदार संपर्कात नसल्याचं बोललं जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com