सातारा : नवमतदार नोंदणीसाठी विशेष शिबिरे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Voter List

सातारा : नवमतदार नोंदणीसाठी विशेष शिबिरे

सातारा : नवमतदार नोंदणीचा उपक्रम प्रत्येक नागरिकांपर्यंत सुलभतेने पोचण्यासाठी ता. २७ व २८ नोव्हेंबरला प्रत्येक विधानसभा मतदारसंघात विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात आहे. या उपक्रमात नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन उपजिल्हा निवडणूक अधिकारी नीता सावंत- शिंदे यांनी केले आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाने चालू वर्षाच्या पुनर्निरीक्षण कार्यक्रमामध्ये एक जानेवारी २०२२ रोजी वयाची १८ वर्षे पूर्ण करणारे नवमतदारांची नोंद करून मतदार यादी सुधारित करण्याचा कार्यक्रम जाहीर केला आहे. हा उपक्रम गावांतील प्रत्येक नागरिकांपर्यंत सुलभतेने पोचावा, यासाठी प्रत्येक विधानसभा मतदारसंघात हे शिबिर होईल. या शिबिरात गावांतील सर्व नागरिकांनी मतदार यादी पाहण्यासाठी व तपासण्यासाठी उपलब्ध करून देण्यात

येणार आहे. यादीतील नोंदीबाबत नागरिकांच्या काही हरकती असल्यास, नोंदीमध्ये दुरुस्ती करावयाची असल्यास नवीन मतदारांना नावनोंदणीसाठी विहित अर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. ग्रामसेवक व संबंधित गावांतील मतदान केंद्रस्तरीय अधिकारी हे नागरिकांना अर्ज भरण्याबाबत मार्गदर्शन करणार आहेत. त्याचप्रमाणे नागरिकांकडून प्राप्त होणाऱ्या हरकती, आक्षेप दुरुस्ती व नावनोंदणी अर्ज एकत्र करून ग्रामपंचायत कार्यालय संबंधित मतदार नोंदणी अधिकारी यांच्याकडे पाठवणार आहेत.

हेही वाचा: IND vs NZ : रोमहर्षक सामन्यात टीम इंडियाची विजयी सलामी

या कामावर राहणार भर...

मृत मतदार व कायम स्थलांतरित मतदारांची नावे वगळणे, लग्न होऊन बाहेर गेलेल्या महिलांची नावे वगळणे, लग्न होऊन गावांत आलेल्या महिलांच्या नावांची नोंदणी, दिव्यांग मतदार चिन्हांकित करणे व एक जानेवारी २०२२ रोजी १८ वर्षे पूर्ण करणारे नवमतदार करण्याच्या कामावर भर देण्यात येणार आहे.

loading image
go to top