esakal | महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या आखाड्यात खटावातील मल्ल ठोकणार शड्डू
sakal

बोलून बातमी शोधा

Satara Latest Marathi News

महाराष्ट्र केसरी स्पर्धेत यापूर्वी प्रशांत शिंदेने 97 किलो गटात कास्यपदक जिंकले होते.

महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या आखाड्यात खटावातील मल्ल ठोकणार शड्डू

sakal_logo
By
राजेंद्र शिंंदे

खटाव (जि. सातारा) : महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी सातारा जिल्हा तालीम संघाच्या वतीने झालेल्या निवड चाचणी स्पर्धेतील 97 किलो माती गटात जाखणगाव (ता. खटाव) येथील प्रशांत शिंदे याने आपल्या लौकिकाला साजेशी कामगिरी करून संघातील आपले स्थान निश्‍चित केले. 

महाराष्ट्र केसरी स्पर्धेत यापूर्वी त्याने 97 किलो गटात कास्यपदक जिंकले होते. यंदा पदकाचा रंग बदलण्याचे आव्हान श्री. शिंदे याच्यापुढे आहे. सांगली येथे भोसले व्यायामशाळेत तो सराव करीत आहे. खातगुण येथील शालेय कुस्ती स्पर्धेतील पदक विजेता सुमित गुजर हा 61 किलो माती गटातून जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहे. 

हे पण वाचा- भारतीय मध्य रेल्वेच्या सल्लागार समितीवर फलटणच्या वैशाली शिंदे; रेल्वेमंत्री गोयलांकडून नियुक्ती

तसेच बुध (ता. खटाव) लढवय्या मल्ल महेश कुंभार 74 किलो गादी गटातून आखाड्यात उतरणार आहे. गुजर आणि कुंभार सह्याद्री संकुल, पुणे येथे सराव करीत आहेत. विजयी मल्लांना वस्ताद शहाजीनाना पवार, संभाजी सावर्डेकर, विजय बराटे, विकास गुरव यांचे मार्गदर्शन लाभले. महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी निवड झालेल्या मल्लांचे सर्वत्र कौतुक होत आहे. 

साताऱ्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

संपादन : बाळकृष्ण मधाळे