सातारा : एसटी वाहतूक अंशत: सुरू; संपानंतर लालपरी पहिल्यांदा धावली

पगारवाढ करूनही विलीनीकरणाच्या मुद्द्यावर काही संघटनांमधील कर्मचारी ठाम आहेत.
 ST
STsakal

सातारा/कऱ्हाड : मागील तीन आठवड्यांपासून सुरू असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर पगारवाढ करूनही विलीनीकरणाच्या मुद्द्यावर काही संघटनांमधील कर्मचारी ठाम आहेत. मात्र, कायमस्वरूपी तत्त्वावरील काही कर्मचारी आज कामावर हजर झाल्याने जिल्ह्यातील विविध डेपोंतील एसटी वाहतूक अंशतः सुरू झाल्याचे दिसून आले.

राज्यभरातील एसटी कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी संप पुकारला आहे. या संपात सुरुवातीला चालक, वाहकांसह सर्वच प्रशासकीय कर्मचारी संपात सहभागी झाले होते. त्यामुळे जिल्ह्यातील ११ डेपोंतील बस जागेवरच उभ्या आहेत. या परिस्थितीमुळे सतत वर्दळ असलेल्या बस स्थानकांमधील वाहतूक ठप्प झाली होती. मागील तीन आठवड्यांपासून सुरू असलेल्या संपावर तोडगा काढण्यासाठी संपकरी व राज्य शासनाने तीन बैठका घेतल्या. त्यामध्ये कर्मचाऱ्यांना ४१ टक्के पगारवाढ केल्याचे सांगण्यात आले. मात्र, कर्मचाऱ्यांनी विलीनीकरणाच्या मुद्द्यावर ठाम राहात आंदोलन सुरूच ठेवले आहे.

 ST
शेतकऱ्यांची आणखी एक मागणी मान्य, कृषीमंत्र्यांची मोठी घोषणा!

एसटी प्रशासनाने कारवाईचे संकेत दिल्याने कायमस्वरूपी तत्त्वावरील काही कर्मचारी कामावर हजर झाले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील काही मार्गांवर बस सुरू झाल्या. त्यामध्ये सातारा शहरातील मध्यवर्ती बस स्थानकातून सातारा- पुणे- २० शिवशाही, सातारा- मुंबई- एक शिवशाही, तर सातारा- फलटण मार्गावर एक लालपरी धावली. कऱ्हाड बसस्थानकातून आज सकाळी कऱ्हाड- स्वारगेट ही पहिली बस रवाना झाली.

दरम्यान, शासनाने कर्मचाऱ्यांना तातडीने कामावर हजर होण्याचे आवाहन केले आहे, तरीही कामावर हजर न झाल्याने कऱ्हाड एसटी आगारातील चार कंत्राटी कर्मचाऱ्यांची सेवा समाप्त करण्यात आली. बारा कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. त्यामध्ये पाच चालक, पाच वाहक आणि दोन कार्यशाळा कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. कर्मचाऱ्यांनी कारवाईची वेळ न आणता कामावर हजर व्हावे, असे आवाहन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com