मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना साताऱ्यातून गेले पत्र

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 29 मे 2020

सातारा जिल्ह्यात वेगाने वाढणाऱ्या कोरोना बाधित रुग्णांच्या काळजीने बारामती पॅटर्न राबविण्याची मागणी केली आहे, तसेच अशा संकटात धैर्याने लढणाऱ्या शासनाच्या सोबतच आम्ही मुलेही आहोत, अशी ग्वाही दिली आहे.

सातारा : नमस्कार, पत्रास कारण, की मुख्यमंत्री महोदय अन्‌ दादा यांना मी लॉकडाउनमुळे या वर्षी मामाच्या गावाला जाऊ शकलो नाही. गेले दोन महिने घरातच आहे. या वर्षी मामाच्या, आजोबांच्या गावाला मला मज्जा करायला मिळाली नाही; पण काही हरकत नाही. कोरोनाशी तुम्हा लढत आहात. मी, माझे मित्र, कुटुंबीय कोणीच बाहेर पडत नाही. आम्ही सारे तुमच्यासोबत आहोत. तेवढा बारामती पॅटर्न साताऱ्याला अन्‌ माझ्या मामाच्या गावाला राबवा हो... अशी आर्त साद साताऱ्यातील शाळकरी मुलाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अन्‌ उपमुख्यमंत्री अजित पवार यांना घातली आहे.

सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा
 
कोरोनाच्या विषाणूच्या प्रसाराच्या भीतीने आलेल्या संचारबंदीमुळे गेले दोन महिने सर्वांवर बंधने आली आहेत. शाळकरी मुलेही घरातच डांबली गेली आहेत. उन्हाळ्याची सुटी म्हणजे मुलांचा जीव की प्राण असते. या सुटीत मामाच्या गावाला जाऊन खूप मज्जा करता येते. खेळण्या बागडण्याबरोबरच मामा- मामी, आजी- आजोबांकडून खूप लाड करून घेता येतात. भाचे आजोळी आली म्हणून मामा- आजोबा, तर त्यांच्या खाण्यापिण्याची खूप चंगळ करतात. त्याहीपेक्षा आईबाबांच्या करड्या नजरेच्या बाहेर खूप हुंदडायला मिळते. यात मुलांचा मोठा आनंद समावलेला असतो. मात्र, या वर्षी कोणत्याच मुलाला आपल्या आजोळच्या मायेत चिंब भिजायला मिळाले नाही, तरीही मुले खेळ, अभ्यास आणि विविध छंदात स्वतःला गुंतवून घेतले आहे. त्यांचेही कानावर येणाऱ्या बातम्यांकडे नाही म्हणायला लक्ष असतेच. कोरोनाचा प्रसार, संकटाची तीव्रता, शासनाचे प्रयत्न त्यांच्याही नजरेतून सुटत नाही, तरीही त्यांच्या मनात आजोळी जायला मिळाले नाही, याची खंत आहेच.
 
ही मनातली खंत साताऱ्यातील धनणीच्या बागेतील प्राथमिक शाळेत शिकणाऱ्या रुद्रनिल गुजरे या मुलाने थेट मुख्यमंत्री अन्‌ उपमुख्यमंत्री दादांना पत्र लिहून व्यक्त केली आहे. सातारा जिल्ह्यात वेगाने वाढणाऱ्या कोरोना बाधित रुग्णांच्या काळजीने बारामती पॅटर्न राबविण्याची मागणी केली आहे, तसेच अशा संकटात धैर्याने लढणाऱ्या शासनाच्या सोबतच आम्ही मुलेही आहोत, अशी ग्वाही दिली आहे. त्याबरोबरच दादा, तेवढा बारामती पॅटर्न साताऱ्यात राबवा हो..., असे साकडेही घातले आहे.

उत्पन्न वाढीसाठी उसाला देशी दारूची मात्रा; मग हे नक्की वाचा

कॉटेजला बाबा देणार एक कोटी, कोविड मान्यता काढल्याने नामुष्की 

अर्ज कोल्हापूर, सांगलीचा अन् मुक्काम साताऱ्यात; कसा येणार कोरोना आटोक्यात

काेराेनाच्या काळात जलमंदिर पॅलेस येथून जनेतची सेवा करण्यात मग्न असलेले खासदार उदयनराजे भाेसले अचनाक संतापले. काय आहे त्यांच्या संतापाचे कारण नेमके कारण वाचा सविस्तर 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Satara Student Sent Letter To Uddhav Thackreay And Ajit Pawar