शिक्षक समितीचा श्‍वास कोरोना रुग्णांसाठी संजीवनी

Satara
Satara

सातारा : कोरेगाव तालुका शिक्षक समितीच्या सभासदांनी सामाजिक बाधिलकीतून निधी जमा करून शिक्षक, त्यांच्या कुटुंबिय व्यक्ती तसेच परिसरातील गरजू लोकांना कोविड-19 या आजारातून दिलासा देण्याच्या उद्देशाने बेड, ऑक्‍सिजन सिलिंडर, ऑक्‍सिमीटर, मास्क सॅनिटायझर, ग्लोज आदी साहित्य खरेदी करून त्याचे नुकतेच लोकार्पण करण्यात आले. 

कोरेगाव शहर, रहिमतपूर व वाठार स्टेशन येथे प्रत्येकी दोन मशिन, सातारारोड एक ऑक्‍सिजन सिलिंडर मोफत उपलब्ध करून देण्यात आले. शिक्षक समितीच्या या उपक्रमाबद्दल सभापती राजाभाऊ जगदाळे, उपसभापती संजय साळुंखे, गटविकास अधिकारी क्रांती बोराटे, तहसीलदार रोहिणी शिंदे, गटशिक्षणाधिकारी रवींद्र खंदारे, विस्तार अधिकारी विशाल कुमठेकर, मायावती शिंदे, शिक्षक समितीचे राज्याध्यक्ष उदय शिंदे, जिल्हाध्यक्ष शंकर देवरे, जिल्हा सरचिटणीस प्रदीप कदम, बॅंकेचे संचालक किरण यादव आदींनी या उपक्रमबद्दल कौतुक करून या ऑक्‍सिजन मशिन रुग्णांसाठी निश्‍चित जीवनदायिनी ठरतील, असा विश्वास व्यक्त केला.

हा उपक्रम यशस्वी करण्याकामी समितीचे तालुकाध्यक्ष नितीन शिर्के, नेताजी जगताप, सुरेश पवार, संतोष मांढरे, अमोल खामकर, विजय शिंदे, रामराव बर्गे, विजय अडसुळ, जहॉंगीर हकीम, शामराव बोतालजी, दशरथ बर्गे, शामराव वाघमोडे, अमीर आतार, शिक्षक समितीच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा मुस्कान आतार, विद्या खराडे, सुजाता गडकरी, संगीता नलवडे, स्वाती कदम, सुनीता शिंदे, अनिता गायकवाड, सुमित्रा जगताप, सुषमा सावंत, सुनीता सावंत आदींनी परिश्रम घेतले तसेच तालुक्‍यातील सभासद, सेवानिवृत्त शिक्षक, पुरुष, महिला सदस्यांनी मदत निधी देऊन सहकार्य केले. कोरेगाव तालुक्‍यातील विविध भागातील गरजूंनी या सुविधांचा लाभ घ्यावा, असे आवाहन समितीतर्फे करण्यात आले. 


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com