या मंदिरात दानपेटीतील रक्कमेवर चोरट्यांचा डल्ला

किरण बाेळे
शनिवार, 1 ऑगस्ट 2020

फलटण तालुक्‍यातील विडणीतील शिवाजी महाराज समाधी मठातील मंदिरात घुसून चोरट्यांनी दानपेटीतील रक्कम घेऊन पाबोरा केला. 

फलटण शहर (जि. सातारा) ः विडणी (ता. फलटण) येथील शिवाजी महाराज समाधी मठातील मंदिराचे कुलूप तोडून चोरट्यांनी दान पेटीतील अंदाजे चार ते पाच हजारांची रोकड घेऊन पोबारा केला आहे. 

विडणी येथील शिवाजी महाराज समाधी मंदिर मठामध्ये काल रात्री 12 च्या सुमारास बंद मंदिराचे कुलूप तोडून चोरट्यांनी मंदिरात प्रवेश केला. परंतु, त्यांची चाहूल लागल्याने तेथील कुत्र्यांचे भुंकणे ऐकून मठाशेजारी राहत असलेले जयवंत कर्वे जागे झाले. त्यांनी घराच्या खिडकीतून पाहिले असता मठामध्ये चोरटे घुसल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर कर्वे यांनी आसपासच्या लोकांना मोबाईलद्वारे चोरटे मंदिरात आल्याचे सांगत मदतीसाठी मठाकडे बोलविले. आसपासचे नागरिक येईपर्यंत चोरट्यांनी दानपेटीतील अंदाजे चार ते पाच हजारांची रोकड घेऊन पोबारा केला. या घटनेची फिर्याद जयवंत कर्वे यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात दाखल केली आहे. 

(संपादन ः संजय साळुंखे) 

 

व्वा..! सवंगड्यांनी थाटला घरगुती राखी उद्योग 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Satara Thieves ransacked the temple treasury