येथे होतेय चाकूचा धाकाने वाटमारी...

बोरगाव येथील चोरीप्रकरणी तिघांना अटक
बोरगाव येथील चोरीप्रकरणी तिघांना अटक

नागठाणे (जि. सातारा) : पुणे- बंगळूर महामार्गावर पाटेश्वरनगर (बोरगाव, ता. सातारा) गावानजीक चाकूचा धाक दाखवून ट्रकचालकास लुटणाऱ्या चोरट्यांना बोरगाव पोलिसांनी शिताफीने अटक केली. ताब्यात घेतलेल्या तीन चोरट्यांपैकी दोघे अल्पवयीन आहेत. 

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अनिकेत चंद्रकांत जाधव (वय 19, रा. कातकरीवस्ती, सदरबाजार, सातारा) असे अटक करण्यात आलेल्या संशयितांचे नाव आहे. ट्रकचालक रहमान खुदबुद्दीन नदाफ (रा.संजयनगर, सांगली) यांनी याबाबत फिर्याद दिली होती. ता. 19 मे रोजी ते मुंबईहून शेतीची औषधे आयशर ट्रकमध्ये भरून सांगली येथे निघाले होते. रात्रीच्या सुमारास लघुशंकेसाठी पाटेश्वरनगर (बोरगाव) येथे थांबले असता पाठीमागून दुचाकीवरून आलेल्या तिघांनी त्यांच्या ट्रकला गाडी आडवी लावली. 
दुचाकीवरच्या या युवकांनी नदाफ यांच्याकडे दारू पिण्यासाठी पैशाची मागणी केली. पैसे देण्यास नकार दिल्यावर त्यापैकी एकाने चाकू दाखवून त्यांच्याजवळील सहा हजार रुपये व मोबाईल काढून घेतला. या वेळी नदाफ यांच्या हातावर चाकूने वार करून तिन्ही युवक दुचाकीवरून पसार झाले. या घटनेची नोंद बोरगाव पोलीस ठाण्यात झाली होती. 

दरम्यान, या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अतिरिक्त पोलिस अधीक्षक धीरज पाटील व सहायक पोलिस उपअधीक्षक समीर शेख यांनी पोलिसांना तपासाच्या सूचना दिल्या. तांत्रिक तपास व गोपनीय माहितीवरून तपास करत बोरगाव पोलिसांनी "हायवे रॉबरी'चा हा गुन्हा उघडकीस आणला. 
संशयितांकडून सुमारे 63 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दोन्ही अल्पवयीन संशयितांना पोलिसांनी शुक्रवारी बाल न्यायालयात हजर केले. अनिकेत यास अटक करण्यात आली आहे. 

सहायक पोलिस निरीक्षक डॉ. सागर वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक वर्षा डाळींबकर, हवालदार मनोहर सुर्वे, स्वप्नील माने, विजय साळुंखे, किरण निकम, राहुल भोये, विशाल जाधव व प्रकाश वाघ हे तपासकामी सहभागी झाले होते. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com