सातारा शहरातील कंटेनमेंट झोन उठला; जिल्ह्यात तीनची भर

सातारा शहरातील कंटेनमेंट झोन उठला; जिल्ह्यात तीनची भर

सातारा ता. 29 : कोरोना बाधीत रुग्ण बरे होणे व नव्याने रुग्ण सापडल्याच्या परिस्थीतीचा आढावा घेऊन प्रांताधिकारी व इन्सीडंट कमांडर मिनाज मुल्ला यांनी सातारा शहरातील एक
कंटेनमेंट झोन (प्रतिबंधीत क्षेत्र) कमी केले असून जावळी तालुक्‍यात दोन तर, सातारा तालुक्‍यात एक असे नविन तीन कंटेनमेंट झोन तयार केले आहेत. 

सातारा शहरातील गेंडामाळ, येथील एका रहिवासी एक कोरोना बाधीत आढळला होता. त्यामुळे अंजली कॉलनी, गेंडामाळ परिसरातील संबंधीत रुग्णाचे घर केंद्रस्थानी मानून तो परिसर
22 एप्रिलला प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहिर करण्यात आला होता. दरम्यान या परिसरात सापडलेला रुग्ण बरा झाला आहे. त्यामुळे या परिसरातील निर्बंध शिथील करण्याची विनंती
सातारा तहसीलदार, मुख्याधिकारी व तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मुल्ला यांच्याकडे केली होती. त्यानुसार त्यांनी आज या परिसरातील निर्बंध शिथील केले. 

दरम्यान, जावळी तालुक्‍यातील मौजे केळघर तर्फ सोळशी व तेटली तसेच आपटी गावामध्ये तसेच सातारा तालुक्‍यातील निगुडमाळ गावात कोरोनाचे बाधीत रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे या परिसरात खबरदारी घेणे आवश्‍यक बनले आहे.

त्यामुळे इन्सिडंट कमारंडर मुल्ला यांनी सोळशी तेटली परिसरातील पुर्वेला तेटली मुऱ्हा मान्टी, पश्‍चिमेला कोयना जलाशय, उत्तरेला आपटी व दक्षिणेला सावरी, आपटी गावात पुर्वेला मान्टी, पश्‍चिमेला कोयना जलाशय, उत्तरेला हात्रेवाडी व दक्षिणेला शिवाजी वाडा हा परिसर तसेच सातारा तालुक्‍यातील निगुडमाळ गावातील पुर्वेस ओढा, पश्‍चिमेस रावसाहेब वांगडे हायस्कूल, उत्तरेला खेळाचे मैदान व दक्षिणेला रामचंद्र निपाणे यांचे शेत हा परिसर प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून जाहिर केला आहे. 

या परिसरच्या हद्दी सिल केल्या जाणार आहेत. तसेच तेथे अत्यावश्‍यक सेवेतील अधिकारी व कर्मचारी वगळता अन्य नागरिकांना प्रवेश करण्यास व बाहेर जाण्यास मनाई करण्यात आली आहे. या ठिकाणी केवळ अत्यावश्‍यक सेवा घरपोच देण्याची व्यवस्था तयार करण्यात येणार आहे. तसेच या परिसरातील सर्व नागरिकांनी आरोग्य सेतू ऍप डाऊनलोड करावे असे आवाहन श्री. मुल्ला यांनी केले आहे. 


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com