गुड न्यूज : कऱ्हाड तालुक्यात कोरोनामुक्तची शंभरी पार

गुड न्यूज : कऱ्हाड तालुक्यात कोरोनामुक्तची शंभरी पार

कऱ्हाड : सातारा जिल्ह्यात कोरोनाबधीत रुग्ण कऱ्हाड तालुक्यात झपाट्यराने वाढले. त्याच झपाट्याने जिल्ह्यात बाधीत रूग्ण बरे होवून घरी परतण्याचे प्रमाणही याच तालुक्यात असल्याचे दिसून येते. हॉटस्पॉट बनलेल्या वनवासमाची, मलकापूरचे सर्वच्या सर्व रुग्ण कोरोनामुक्त होवून घरी परतले असून नव्याने हॉटस्पॉट बनू पाहत असलेल्या म्हासोलीतीही 35 पैकी 15 कोरोनामुक्त झाले आहेत. येथील कृष्णा रुग्णालयातून आज (शुक्रवार) नऊ कोरोनामुक्त रुग्णांना डिस्चार्ज दिला. त्यामुळे कऱ्हाड तालुक्यातील कोरोनामुक्त रूग्णांची संख्या 111 झाली आहे.

कोरोनामुक्त होवून डिस्जार्च मिळालेल्यांमध्ये म्हासोली, इंदोली, भरेवाडी आणि मेरमेवाडी येथील नऊ रुग्णांचा समावेश आहे. कृष्णा हॉस्पिटलमधून टाळ्यांच्या गजरात त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. यात म्हासोली येथील पाच  रुग्णांचा समावेश असल्याने सलग दुसऱ्या दिवशीही म्हासोलीकरांना दिलासा मिळाला. कृष्णा हॉस्पिटलमधून आत्तापर्यंत ७७ कोरोनामुक्त रूग्णांना डिस्चार्ज दिला आहे. काही दिवसापासून कृष्णाच्या कोरोना वॉर्डमध्ये उपचार घेत असलेली म्हासोली येथील ६० वर्षीय महिला, ५० वर्षीय पुरुष, ४० वर्षीय पुरुष, ५० वर्षीय पुरुष आणि १२ वर्षीय मुलगी अशा पाच रुग्णांचे उपचारानंतरचे अहवाल निगेटीव्ह आल्याने त्यांना आज डिस्चार्ज दिला. इंदोली येथील ३९ वर्षीय पुरुष, भरेवाडी येथील ५२ वर्षीय पुरुष, ४३ वर्षीय महिला, मेरमेवाडी येथील २३ वर्षीय पुरुष अशा अन्य चार रुग्णांचेही अहवाल निगेटीव्ह आल्याने त्यांनाही डिस्चार्ज दिला.

यावेळी तहसीलदार अमरदीप वाकडे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संगीता देशमुख, कृष्णा हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक ए. वाय. क्षीरसागर, कृष्णा अभिमत विद्यापीठाचे सहाय्यक कुलसचिव एस. ए. माशाळकर, प्राचार्य डॉ. एस. टी. मोहिते, डॉ. शशीकिरण एन. डी., डॉ. संजय पाटील, डॉ. रोहिणी बाबर, डॉ. विश्वास पाटील, वैशाली यादव, नीता शेवाळे, नीता इनामदार, मंजुषा कुलकर्णी यांच्यासह हॉस्पिटलचे कर्मचारी उपस्थित होते.

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना साताऱ्यातून गेले पत्र

क्वारंटाइन चाकरमान्यांना हवा मायेचा ओलावा! गावकरी, नातेवाईक करताहेत टाळाटाळ

सातारा शहरातील कंटेनमेंट झोन उठला; जिल्ह्यात तीनची भर

सातारा : उद्योगांची चाके फिरली, पण...

सातारा जिल्ह्यात आढळली काेराेना बाधित पोलिस अधिकारी


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com