esakal | उदयनराजेंसमवेतच्या निर्णयावर शिवेंद्रसिंहराजे ठाम
sakal

बोलून बातमी शोधा

उदयनराजेंसमवेतच्या निर्णयावर शिवेंद्रसिंहराजे ठाम

त्यातच आता दस्तुरखूद्द आमदार शिवेंद्रसिंहराजेंनी देखील जशास तसे ही भुमिका घेतल्याने सातारा शहरासह जावळीकरांना पुन्हा राजकीय घमासान पाहण्यास मिळत आहे. 

उदयनराजेंसमवेतच्या निर्णयावर शिवेंद्रसिंहराजे ठाम

sakal_logo
By
महेश बारटक्के

कुडाळ (जि. सातारा) : साताऱ्यात संघर्ष नको म्हणून आम्ही एकत्र आलो पण आम्ही एकत्र आलेलो काही जणांना बघवत नाही म्हणून काही जण स्वतःची राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी माझ्या कानात काही तरी सांगतात आणि तिकडे उदयनराजेंच्या (Udayanraje Bhosale) कानात काहीतरी सांगतात, ज्या त्या वेळी ज्या त्या गोष्टी घडतील. राजघराण्याच्या नावाला धक्का लागू नये ही कायम भुमिका घेतली आहे व यापुढेही राहील असे ठाम भूमिका आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले (Shivendra Raje Bhosale) यांनी पुन्हा एकदा मांडली.

(कुडाळ ता.जावळी) येथे बुधवारी आयोजिलेल्या शेतकरी मेळाव्यात शिवेंद्रसिंहराजे बोलत हाेते. त्यावेळी शिवेंद्रसिंहराजेंनी ज्याला दोन हाथ करायचे आहेत त्यांनी समोरा समोर येऊन करावेत. सोबत राहून दगा फटक्याचे राजकारण करू नये. मी राजघराण्याचे नाव वापरून कधीच राजकारण करत नाही असे शिवेंद्रसिंहराजेंनी स्पष्ट केले. यावेळी त्यांनी उदयनराजेंचे आणि त्यांचे कान भरणा-यांवर नेम धरला.

शांत संयमी राजे भडकले; काट्याने काटा काढण्याची तयारी असल्याचा भरला दम

जर कोणी आडगेपणा करत असेल तर मी पण किती आडगा वागू शकतो हे वेळ आल्यावर दाखवून देईन, आपला जर कोण काटा काढणार असेल तर मी पण काट्याने काटा काढल्याशिवाय राहणार नाही, मी कोणाला घाबरत नाही, ना कधी घाबरणार असेही शिवेंद्रसिंहराजेंनी स्पष्ट करुन आपली राजकीय वाटचाल आता जशास तसे उत्तर देणारी राहील असे जाहीर करुन टाकले. यामुळे मेळाव्यात उपस्थित असलेल्या त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य पसरले. 

दरम्यान सातारा पालिका निवडणुकीत आमदार शशिकांत शिंदे यांनी राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या माध्यमातून पॅनेल उभे करु अशी घाेषणा नुकतीच केली हाेती. त्यानंतर जिल्हा परिषद सदस्य दीपक पवार यांनी राष्ट्रवादी काॅंग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी समविचारी पक्षांसाेबत चर्चा करुन सातारा पालिकेच्या निवडणुकीसंदर्भात निर्णय घ्यावा असे सांगितल्याचे माध्यमांशी बाेलताना सांगितले हाेते. त्यातच आता जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेची निवडणुक जाहीर झाली आहे. या पार्श्वभुमीवर सातारा आणि जावळीत राजकीय कूरघाेड्या सुरु झाल्याची चर्चा हाेती. त्यातच आता दस्तुरखूद्द आमदार शिवेंद्रसिंहराजेंनी देखील जशास तसे ही भुमिका घेतल्याने सातारा शहरासह जावळीकरांना पुन्हा राजकीय घमासान पाहण्यास मिळणार असे चित्र निर्माण झाले आहे.

मी इथं बरा आहे शिवेंद्रसिंहराजे

Edited By : Siddharth Latkar

loading image