सातारा : दरोडेखोरांची दुचाकी स्फोट करून नष्ट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

satara

सातारा : दरोडेखोरांची दुचाकी स्फोट करून नष्ट

कऱ्हाड : गजानन हाउसिंग सोसायटीतील बँक ऑफ इंडियाच्या एटीएम मशिनच्या दरोड्यासाठी वापरलेल्या जिलेटिनचा पोलिसांनी स्फोट केला. त्याच दरोड्यातील दुचाकी करवडी (ता. कऱ्हाड) येथील शेतात लपवून ठेवलेल्या स्थितीत काल (ता. २०) रात्री दहाच्या सुमारास पोलिसांना सापडली. संशय आल्याने पोलिसांनी

तपासणी करताना बॉम्ब शोध व श्वान पथकांनी दुचाकीत जिलेटिनची स्फोटके असल्याची खात्री दिली. ती स्फोटके काढताना दगाफटकाही होण्याचा धोका होता. त्यावेळी स्फोटकासह ही दुचाकी पोलिसांनी आज सकाळी ११ वाजता स्फोट करून नष्ट केली. त्यावेळीही मोठा धमाका दिल्याने करवडी परिसरात घबराट पसरली.

दरोडेखोरांचा सैदापूर येथे बँक ऑफ इंडियाच्या एटीएम सेंटर जिलेटिनने उडविण्याचा प्रयत्न पोलिसांच्या सतर्कतेने सोमवारी पहाटे फसला. दरोडेखोरांनी डोळ्यात स्प्रे मारल्याने चार पोलिस जखमी झाले होते. त्याही स्थितीत एकास अटक आहे. सचिन वाघमोडे (मूळ रा. बीड, सध्या रा. पुणे) असे अटक केलेल्याचे नाव आहे. घटनास्थळी सापडलेली दुचाकी वाघमोडेचीच आहे, असे तपासात निष्पन्न झाले. अन्य तिघे फरारी आहेत. दुसरी दुचाकी वापरल्याची माहिती पोलिसांना संशयिताने दिली होती. जिलेटिनची स्फोटक त्याच दुचाकीवरून आणली होती, अशीही माहिती मिळाल्याने पोलिस त्या दुचाकीचा शोध घेत होते. सहायक पोलिस निरीक्षक अमित बाबर यांच्या पथकाला काल रात्री नऊच्या

दुसरा स्फोट...

दरोड्यात करवडीतील संशयित डॉ. शुभंतू पोळ याचाही समावेश आहे. नगर जिल्ह्यातील अशोक झांबरे व त्याच्यासोबत अन्य एक प्रवचनकारही टोळीत आहे. चौघांनी एटीएम सेंटर स्फोटकांनी उडविण्याचा कट रचला होता. मात्र, तो प्रयत्न फसला. एटीएम सेंटरमधील पहिला स्फोट सोमवारी (ता. १८) पोलिसांनी घडवला. त्या वेळी जागा मोकळी व बंदिस्त केली होती. त्याच दरोड्यात डॉ. पोळच्या शेतात लावलेली त्याचीच दुचाकी स्फोटकासह पोलिसांना सापडली. त्यातील स्फोटक धोकादायक असल्याने त्याही दुचाकीचा स्फोट पोलिसांनी घडवत ती स्फोटके नष्ट केली. एकाच टोळीने वापरलेल्या स्फोटकांचा दुसरा स्फोट पोलिसांनी केला.