पुण्यातील जैव वैद्यकीय कचऱ्याबाबत प्रशासनासह पालकमंत्र्यांनीच खूलासा करावा : किशाेर शिंदे

पुण्यातील जैव वैद्यकीय कचऱ्याबाबत प्रशासनासह पालकमंत्र्यांनीच खूलासा करावा : किशाेर शिंदे

सातारा : पुणे महापालिकेच्या हद्यीतील बायोमेडिकल वेस्ट पुण्याच्या आसपासचे प्लॅन्ट सोडून, सातारा पालिकेच्या प्लॅंटला पाठविणेस कोणी परवानगी दिली, शनिवार व रविवार दोन दिवस शासकीय सुटटी असताना नेमके त्याच दिवशी आणि रात्रीच्या वेळेसच पुणे महापालिकेच्या मालकीचे हे येथे ट्रक का आले त्याला आयुक्तांनी परवानगी दिली कशी लॉकडावूनच्या पाचव्या टप्यात, जिल्हाबंदी असताना, अत्यावश्‍यक आणि रितसर पासेस असलेल्या व्यक्ती आणि वाहनांशिवाय अन्य कोणास परवानगी नसताना, अश्‍या परिस्थि।तीत शिरवळवरुन हे ट्रक सातारा जिल्हा हद्यीत आले कसे, शिरवळ चेक पोस्ट वरील संबंधित पोलीस अधिकारी, जिल्हा प्रशासन यांनी कोणती चौकशी करुन, सदरचे ट्रक सोडले बायोमेडिकल वेस्ट सारख्या सेन्सेटीव्ह प्रश्‍नाबाबत पुण्याच्या आणि सातारच्या पालकमंत्री महोदय यांना माहिती देण्यात आली होती का. या सर्व प्रश्‍नांची सखोल चौकशी होवून, दोषी कोणीही असो त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल झाले पाहिजेत, अशी मागणी पालिकेचे उपाध्यक्ष किशोर शिंदे यांनी केली आहे. 

सातारा नगरपरिषदेचे पहिले लोकनियुक्त नगराध्यक्ष असलेल्या कै.प्रतापसिंहमहाराज उर्फ दादा महाराज यांच्या कार्यकाळातच पाटीच्या मैला वाहतुकीच्या प्रथेला आळा घालण्यात आला. त्यानंतर सन 2002 साली सातारा विकास आघाडीची एकहाती सत्ता आल्यावर खासदार उदयनराजे भाेसले यांच्या नेतत्वाखाली नगरपरिषदेच्या इतिहासात कचराकुंडी मुक्त शहर ही संकल्पना राबविणेस सुरुवात केली. शहरात कचरा साठुच नये म्हणून घरोघरी जावून, कचरा उचलण्याकरीता घंटागाडया सुरु केल्या, मंडई सारख्या ठिकाणी ट्रॅक्‍टर ट्रॉली लावून कचरा उचलण्यास सुरुवात केली. टप्याटप्याने आरोग्य विभागाकरीता नवीन डंपर प्लेसर, जेसीबी, खरेदी केले, बायोमडीलक वेस्ट डिस्पोजल प्लॅन्ट नेचर इन नीड चे सहकार्याने उभारण्यात आला. घनकचरा व्यवस्थापनांतर्गंत कचरा डेपावर कचरा विलगीकरण करणे, कच-यापासून ख।त निर्माण करणे, कचरा डेपोच्या जागेला सर्व बाजुने कंपौंड बांधणे,अशी विविध कामे लोकहित डोळयासमोर ठेवून, सातारा विकास आघाडीच्या माध्यमातुन, करण्यात आलेली आहेत. कचरा श।हरात ठिकठिकाणी साठुच नये अशी संकल्पना राबविणारी त्यावेळी महाराष्ट्रात हाताच्या बोटावर मोजता येणा-या नगरपालिकांमध्ये सातारा नगरपरिषदेचा अग्रक्रमाने समावेश होता. सातारा विकास आघाडीने सुरु केलेले अभिनव उपक्रम पुढे यशस्वी ठरले. खासदार उदयनराजे भोसले यांनी लोकहित लक्षात घेवून राबविलेल्या या उपक्रमामध।ुन, नागरीकांच्या सार्वजनिक आरोग्याविषयी असणारी तळमळ, काळजी स्पष्टपणे दिसून येते. सातारा विकास आघाडीची सत्ता येण्यापूर्वी अश्‍या सुविधा सातारकर नागरीकांना मिळु लागल्या. 

तसेच सोनगांव येथील स्वतःच्या खाजगी मालकीची जागा, सातारचे पहिले लोकनियुक्त नगराध्यक्ष कै.श्रीमंत छत्रपती प्रतापसिंहमहाराज उर्फ दादामहाराज यांनी सातारा नगरपरिष।देस विनामुल्य दिली आहे. सातारा श।हरालगत वेगवेगळया उपनगरामधील ग्रामपंचायतींचा रोज गोळा केला जाणार कचरा, नगरपरिष।देच्या सोनगांव येथ।ील कचरा डेपोवर टाकला जात आहे. त्यास सातारा विकास आघाडीने कधीही अटकाव केलेला नाही. ज्यांनी अटकाव केला ते आता घरी बसले आहेत. शहरालगत असणा-या त्रिशंकू भ।ागाच्या विकासाकरीता, खासदार उदयनराजे भाेसले नेतत्वाखाली आंदोलन करुन, जिल्हा परिष।देकडून विशेष निधीची दरवर्षी कायमस्वरुपीची तरतुद करुन घेण्यात आली आहे. त्रिशंकू भाग किंवा शहरालगतचा उपनगरीय भाग यांना कधीही सापत्नपणाची वागणुक सातारा विकास आघाडीकडून देण्यात आलेली नाही. याउलट त्याभागात वेळोवेळी आरोग्य,दिवाबत्ती,अश्‍या सुविधा नगरपरिषदेच्या माध्यमातुन उपलब्ध करुन देण्यात आलेल्या आहेत. 

सध्या कोविड-19 या संसर्गजन्य रोगाने जगामध्ये थैमान घातले असताना, खासदार उयदनराजे भाेसले यांनी दिलेल्या सूचनांनुसार सातारा नगरपरिषेच्या पदाधिाकारी-नगरसेवक आणि कर्मचा-यांनी विशेष करुन आरोग्य कर्मचारी यांनी जीवाची बाजी लावून, शहर स्वच्छता मोहिम अहोरात्र राबविली आहे. उदयनराजे भाेसले यांच्या नेतत्वाखाली अद्यावतीकरण करुन सुरु करण्यात आलेले कस्तुरबा हॉस्पिटल आणि श्रीमंत छत्रपती दादामहाराज रुग्णालय (गोडोली) यांचेकडील असणा-या मेडिकल ऑफिसर व स्टाफ व्दारे घरोघरी जावून, काविड-19 च्या पार्श्‍वभुमीवर सर्वेक्षण,औषधोपचार जरुरीप्रमाणे मोफत करण्यात येत आहेत.आवश्‍यक त्या ठिकाणी निर्जंतुकीकरण करणे, कोरोनाने बाधि।त झालेल्या मयत व्यक्तींवर कोणीही पुढे येत नसताना, नगरपरिषदेच्या माध्यमातुन अंतिम संस्कार करण्यात येत आहेत. अनेक ठिकाणी संस्थात्मक विलगीकरणाची व्यवस्था नगरपरिषदेच्या स्तरावरुन करण्यात आली आहे. ज्या ठिकाणी शासकीय कॉरंटाईन सेन्टर्स आहेत या ठिकाणी नगरपरिषदेचेच कर्मचारी सेवा बजावत आहेत. शहर हददीतील सार्वजनिक आरोग्य अबाधिात राखण्याबरोबरच शहराला लागुन असणारी उपनगरे तसेच हद्यीबाहेरील अनेक ठिकाणी मानवतेच्या भावनेतुन जी लागेल ती सेवा नगरपरिषदेच्या माध्यमातुन दिली आहे. केवळ सातारकर नागरीकांचे सार्वजनिक आरोग्य सुरक्षित रहावे म्हणूनच या सर्व उपाययोजना युध्दपातळीवर राबविल्या गेल्या आहेत. 

त्यामुळे सातारकरांच्या भावना ऐकून या पुणे महानगरपालिकेच्या बायोमेडिकल वेस्ट जे आणले गेले आहे त्याची सखाेल चौकशी केली जावून सातारा जिल्हा प्रशासन, पुणे महानगरपालिका प्रशासन यांनी व पुण्याचे आणि सातारा जिल्हयाचे पालकमंत्री यांनी तात्काळ खुलासेवजा स्पष्टीकरण, करावे व संबंधीतांवर कडक कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी सातारकर नागरीकांच्या वतीने सातारा विकास आघडीने केली आहे असेही किशोर शिंदे यांनी पत्रकात नमुद केले आहे.

...म्हणून पुण्यातील जैव वैद्यकीय कचरा साताऱ्यात आणला जाताेय 

शिवेंद्रसिंहराजे संतापले, सातार्‍यात आधीच अडचणी आहेत त्यात...

दहावी नंतर करिअर फक्त कसे निवडावे नव्हेतर कसे घडवावे यासाठी जॉईन करा सकाळ आणि दिशा अकॅडमी, वाई आयोजित वेबिनार 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com