esakal | Video : पालकांनाे, अशी घ्या आपल्या मुलांची काळजी
sakal

बोलून बातमी शोधा

Video : पालकांनाे, अशी घ्या आपल्या मुलांची काळजी

जिल्हाधिकारी कार्यालय, पोलिस विभाग आणि शासनाच्या माहिती संचालनालयाने एक सुंदर व्हिडिओ प्रसारित केला आहे. समस्त पालकांनी आपल्या मुलांची काळजी घ्यावी, असे मत त्यामध्ये व्यक्त केले आहे.

Video : पालकांनाे, अशी घ्या आपल्या मुलांची काळजी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सातारा : दोन महिने घरात बसून कंटाळलेली मुले आता सैलावली जाऊ लागली असून अंगणात, नजिकच्या मोकळ्या जागेत, इमारतीच्या तळाच्या पार्किंगच्या जागेत पत्ते, लपाछपी, आंधळी कोशिंबीर असे विविध खेळांचे डाव मांडू लागले आहेत. मात्र कोरोना विषाणूची बाधा होऊ नये यांसाठी कोणतीच काळजी घेतली जात नाही. पालकांनी या संदर्भात काळजी घेण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

कोरोनाच्या विषाणुच्या प्रसाराच्या भितीने सुरू असलेल्या संचारबंदीमुळे गेले तीन महिने सारे काही बंद असल्याने नागरिकांप्रमाणे छोटी मुले ही घरातच आहेत. त्यांनी स्वतःला अभ्यास, विविध खेळ आणि छंद जोपासण्यात गुंतवून घेतले होते. मात्र आता मुलेही क॔टाळून गेली आहेत. या महिन्यात शासनाने संचारबंदी शिथिल केली असल्याने पालकां प्रमाणे छोट्या मुलांनाही थोडी ढिलाई मिळाली की काय असे चित्र दिसू लागले आहे.

बंगल्यांचे हाॅल, घर, घरानजिकच्या मैदानावर आसपासच्या परिसरात, घरातील मुले सकाळी, दुपारी सावलीत तसेच सायंकाळी एकत्र जमून खेळ खेळताना दिसतात. त्या वेळी कोणाच्याही तोंडाला मास्क नसतो. सुरक्षित अंतराच्या नियमाचे त्यांना फारसे काही नसते. सर्व नियमांना पायदळी तुडवत खेळ सुरू असतात. यामुळे विषाणुचा संसर्ग होणे सहज शक्य असते. कोरोनाच्या विषाणुची बाधा आपल्या मुलांना होऊ नये यांसाठी पालकांनीच दक्षता घेणे गरजेचे आहे. आपली मुले इतर मुलांत खेळायला जाणारच असतील तर किमान त्यांना मास्क लावणे बंधनकारक केले पाहिजे, असे मत व्यक्त केले जात आहे.

ही बाब प्रशासनाच्या लक्षात आली असून जिल्हाधिकारी कार्यालय, पोलिस विभाग आणि शासनाच्या माहिती संचालनालयाने एक सुंदर व्हिडिओ प्रसारित केला आहे. समस्त पालकांनी आपल्या मुलांची काळजी घ्यावी, असे मत व्यक्त केले आहे.

सातारा मिलिटरी कॅन्टीनबाबत महत्वाची बातमी

'ताे" विषय काढला की कॉग्रेस आमदार पृथ्वीराज चव्हाण काहीच बाेलत नाहीत

...तरीही सातारी कंदी पेढ्याची चवच न्यारी

निर्बंध उठले खरे.... पण सलून व्यावसायिकच कात्रीत 
 

loading image
go to top