सातारा : वळई-विरळीत ST अभावी पायपीट

लॉकडाउनमुळे म्हसवड-विरळी मुक्काम येणारी बससेवा बंद करण्यात आली होती.
ST अभावी पायपीट
ST अभावी पायपीटsakal

कुकुडवाड : एसटी महामंडळाचा संप मिटून जवळपास तीन ते चार महिने होत आले असले तरी वळई-विरळीकर यांना अद्यापि लालपरीची प्रतीक्षा करावी लागत आहे. महामंडळाचे वळई-विरळी व पंचक्रोशीकडे दुर्लक्ष झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

लॉकडाउनमुळे म्हसवड-विरळी मुक्काम येणारी बससेवा बंद करण्यात आली होती. त्यानंतरच्या काळात काही काळ बससेवा सुरू झाली. त्यातच पुन्हा बस महामंडळ कर्मचाऱ्यांनी संपाचे हत्यार उपसले मग नंतर बससेवा बंद झाल्याने आता या गोष्टीला जवळपास दोन ते अडीच वर्षे उलटून गेली असली तरी अद्याप म्हसवडवरून विरळी मुक्काम येणारी महामंडळाची बससेवा सुरू झालेली नाही. पूर्वी महामंडळाच्या बससेवेद्वारे वीरळीमार्गे वळई, पानवन, गंगोती, पुळकोटी, जांभुळणी फाटा या मार्गाकडे दिवसातून चार फेऱ्यात बससेवा सुरू होती. पण, आता या सर्व बसफेऱ्या बंद आहेत, त्यामुळे या भागातील विद्यार्थ्यांना व प्रवाशांना म्हसवडला जाणे जिकिरीचे झाले आहे. आता विद्यार्थ्यांच्या शाळा सुरू झाल्या असल्याने शाळेत जाण्यासाठी बससेवा बंद असल्याने अडचण निर्माण होत आहे. यामुळे विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांची मागणी होत आहे.

कोरोनानंतर सातारा जिल्ह्याची परिस्थिती पूर्ववत सुरू झाली असून संप मिटूनही बरेच दिवस झाले. म्हसवड-विरळी येणाऱ्या-जाणाऱ्या महामंडळाच्या सर्व बसफेऱ्या पूर्वीप्रमाणे सुरू कराव्यात, प्रवासी-विद्यार्थी याचा अंत पाहू नये.

-प्रशांत गोरड,सरपंच, विरळी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com