वरदराज कणसे स्मृती करंडक आंतरराष्ट्रीय ऑनलाईन क्लासीकल बुध्दीबळ स्पर्धेत यवतमाळचा अरुण प्रसाद अजिंक्य

वरदराज कणसे स्मृती करंडक आंतरराष्ट्रीय ऑनलाईन क्लासीकल बुध्दीबळ स्पर्धेत यवतमाळचा अरुण प्रसाद अजिंक्य

सातारा : लिचेस या ऑनलाईन चेस पोर्टलवर झालेल्या वरदराज फाउंडेशन आणि सातारा जिल्हा बुध्दीबळ संघटनाच्या सहकार्याने आयोजिलेल्या वरदराज स्मृती करंडक ऑनलाईन क्लासीकल बुध्दीबळ स्पर्धेत यवतमाळच्या अरुण प्रसाद याने निर्विवाद वर्चस्व राखत जिंकले.

स्पर्धेचा ऑनलाईन बक्षीस समारंभ मुख्य पाहुणे विशाल कणसे (स्पर्धा संयोजक - संस्थापक, वरदराज फौंडेशन), प्रशांत शिंगटे (अध्यक्ष, वरदराज फौंडेशन) संदीप जाधव, सुधाकर भोसले, रणजित सावंत, सुनिल जाधव, संजय शिंदे ,दिलीप देशमुख. मुख्य पंच म्हणून आंतरराष्ट्रीय पंच कविराज सावंत आणि आंतरराष्ट्रीय फिडे पंच अॅड. प्रणव टंगसाळे, फिडे पंच पवन राठी, राष्ट्रीय पंच सतिश ठाकुर, राज्य पंच पवन कातकडे यांनी काम पाहीले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी प्रशांत शिंगटे, सातारा जिल्हा बुद्धीबळप्रेमी यांनी मोलाचे सहकार्य केले. अॅॅड.विनोद घाडगे यांनी आभार मानले. 

स्पर्धेतील विजेते असे : खुला गट: अनिल प्रसाद (यवतमाळ), प्रज्वल आव्हाड (नगर), अनिरुद्ध पोटवाड (मुंबई) , वरद आठल्ये (कोल्हापुर) , प्रथम लोहकरे (मुंबई) , श्रावणी पाटील (उरण), प्रणव बोगावत (पुणे) ,  रेहान महात (कोरेगाव) , विनोद घाडगे (सातारा) , आर्या पिसे (पुणे). सर्वोत्कृष्ट जेष्ठ खेळाडु वयोगट गिरीश जोशी (पुणे), बी.एस.नाईक (कोल्हापुर), सर्वोत्कृष्ट महिला खेळाडु सृष्टी हिप्परगी (जत), रिद्धी उपासे (सोलापुर), रितिका सिन्नरकर (पुणे). सर्वोत्कृष्ट अनरेटेड खेळाडु सिद्धी पाटील (पुणे), वेदांत योगेश काळे (पुणे), ईशिता लाहोटी (सातारा). 

सर्वोत्कृष्ट आठ वर्षाखालील खेळाडु आदित्य धकरास (कल्याण), समर्थ हिप्परगी (जत), विवान सोनी (पुणे).  सर्वोत्कृष्ट १० वर्षाखालील खेळाडु प्रथमेश शेलार (पुणे), विरेश शरणार्थी (सोलापुर) , श्रेया हिप्परगी(जत), १२ वर्षाखालील खेळाडु आर्य राठोड (वसई), अरविंद अय्यर (कल्याण) , क्षितिज दत्ता (डोंबिवली), सर्वोत्कृष्ट १४ वर्षाखालील खेळाडु निल काकडे (पुणे) , वरद वालडे (पुणे) , साई बलकवडे (अलिबाग) ,सर्वोत्कृष्ट १६ वर्षाखालील खेळाडु सोहेल तांबोळी(माढा) कर्तव्य अनादकत (गुजरात) , असिम सय्यद (सातारा) , प्रोत्साहनपर खास बक्षिस आदित्य घुले (जालना).

राहुल गांधींचे ऐकले असते तर देशावर आलेले हे संकट नक्की टळले असते

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com