धबधबा पहायला येताय पण..!

patan
patan

तारळे (जि. सातारा) : कोकणात व मुंबईत पडणाऱ्या मुसळधार पावसाने यंदा गावाकडे पाठ फिरवली आहे. अधूनमधून येणाऱ्या हलक्‍या सरी वगळता मोठ्या पावसाने हुलकावणी दिली आहे. परिणामी सडावाघापूर येथील प्रसिद्ध उलटा धबधब्याचे अजून दर्शन झालेले नाही, तरीही धबधबा पाहण्यासाठी तरुणाईची गर्दी होत असून, कोरोनाच्या प्रादुर्भावातही होणारी गर्दी संसर्गाचा धोका ठरण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. 

जुलै, ऑगस्ट महिन्यात सडावाघापूर पठारावर निसर्गप्रेमी व पर्यटकांच्या गर्दीने फुलत. तेथील विलोभनीय निसर्गाने जिल्ह्यासह बाहेरील पर्यटकांना भुरळ पाडली आहे. हिरव्यागार गवताच्या गालीच्यावर धुकेरुपी दुलई पांघरल्याचा होणारा भास, जणू काही स्वर्गच डोंगरावर अवतरल्याचाच होणार अनुभव अनेकांना वेड लावत आहे. झोंबणारा गार वारा, भिरभिरणारी पवनचक्‍क्‍यांची पाती, सोसाट्याचा वारा, धुक्‍यात हरवलेला रस्ता व कौलारू घरे... निसर्गाने मुक्तहस्ताने उधळण केलेले हे पठार म्हणजे कास, कोयनानगर व महाबळेश्वरसारखेच पर्यटकांच्या पसंतीस उतरले आहे. 

पावसाळा सुरू झाला, की तरुणाईची पावले आपसूक या भागाकडे वळतात. नुकतीच त्याची झलक बघायला मिळू लागली आहे. कोरोना संसर्गाच्या स्थितीतही पठारावर गर्दी होऊ लागली आहे. मात्र, अजूनही उलटा धबधबा सुरू झालेला नाही. पावसाचा अपेक्षित जोर नसल्याने अजून काही दिवस धबधब्याचे दर्शन होण्यास लागू शकतात. असे असली तरी येथील निसर्गसौंदर्य न्याहाळण्यासाठी पर्यटकांची पावले पठारावर पडू लागली आहेत. ही गर्दी कोरोनासाठी निमंत्रण ठरू नयेत, अशी अपेक्षा स्थानिकडून व्यक्त होत आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com