भिरडाचीवाडीतील युवकांकडून भेकराला जीवदान

भिरडाचीवाडीतील युवकांकडून भेकराला जीवदान

भुईंज (जि.सातारा) : भिरडाचीवाडी येथे डोंगरातून पाण्याच्या शोधात आलेल्या भेकराला तरुणांच्या सतर्कतेमुळे जीवदान मिळाले आहे. त्याला वन विभागाच्या ताब्यात देण्यात आले आहे. भिरडाचीवाडी येथील खंडोबाच्या डोंगरातून आज सकाळी पाण्याच्या शोधात एक भेकर वस्तीनजीक आले होते. या भेकराचा सुगावा मोकाट कुत्र्यांच्या टोळक्‍याला लागल्याने त्याचा पाठलाग करून त्यास पकडण्याचा प्रयत्न करीत होते.

ही बाब भिरडाचीवाडी येथील युवकांच्या लक्षात आल्याने त्यांनी मित्रांना भेकराला वाचविण्यासाठी मदत करण्यासाठी मोबाईलवरून सांगितले. त्यावर तानाजी गडदे, विजय गडदे, उमेश गडदे, राजेंद्र भिसे, सागर दगडे, अविनाश ठोंबरे, अरविंद ठोंबरे, राजेंद्र भिसे, नवनाथ गडदे, अमोल गडदे, ओम गडदे यांनी डोंगरकपारीतून भेकराचा पाठलाग करणाऱ्या भटक्‍या कुत्र्यांना पळवून लावले. जखमी भेकराला त्यांच्या तावडीतून सोडविले. त्यानंतर त्याच्यावर प्रथमोपचार करून वन विभागाला कळवून त्यांच्या ताब्यात देण्यात आले.

Video : बापरे! पाेत्यात मृतदेह, करंजे परिसरात बघ्यांची गर्दी

Video : असे झाल्यास पूरस्थितीत एनडीआरएफच्या टीमची वाट पाहायची वेळ येणार नाही : खासदार श्रीनिवास पाटील

CoronaUpdate : जिल्ह्यात काेराेनाबाधित वाढतच आहेत; सातारा तालुक्यात जिहेत साखळी ताेडण्याचे आव्हान 

Video : इंधन दरवाढविरोधात पृथ्वीराज चव्हाण यांचे कऱ्हाडात बैलगाडीतून आंदोलन

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com