चिमुकल्याच्या वाढदिवशी युवकांनी केले रक्तदान

jawali
jawali

भिलार (जि. सातारा) : प्रत्येक जण वाढदिवस हा आपल्या परीने द्विगुणित करतो. तापोळा (ता. महाबळेश्‍वर) येथील बालकाचा वाढदिवस हा अनोख्या पद्धतीने रक्तदान शिबिर आयोजित करून साजरा झाला. 

तापोळा हे महाराष्ट्रातील काश्‍मीर समजले जाते. तेथील सामाजिक कार्यकर्ते तुकाराम धनावडे यांचे चिरंजीव स्वराज याचा वाढदिवस रक्तदान शिबिराचे आयोजन करून केल्याने या अनोख्या वाढदिवसाचे सर्वत्र कौतुक होत आहे. या शिबिरात 40 युवकांनी रक्तदान करून आपले राष्ट्रीय कर्तव्य बजावले. 

या कार्यक्रमास नवरात्र उत्सव बहुउद्देशीय मंडळाचे अध्यक्ष शिवाजी भोसले, उपाध्यक्ष प्रकाश पडगे, पर्यटन विकास महामंडळाचे सदस्य विठ्ठलशेठ धनावडे, सभापती अंजनाताई कदम, तापोळ्याच्या सरपंच दर्शना धनावडे, महाबळेश्वर तालुका समन्वय समितीचे अध्यक्ष धोंडीबा धनावडे, "मार्ट'चे संचालक विठ्ठलशेठ धनावडे, आनंद धनावडे, उपसरपंच मानाजी धनावडे, माजी सरपंच प्रकाश पडगे, विजय झरेकर, गणेश भोसले, ग्रामस्थ व कार्यकर्ते उपस्थित होते. 

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. मुख्यमंत्र्यांनीही आवाहन केल्याचा विचार करून आम्ही कुटुंबाने आणि ग्रामस्थांनी स्वराजच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर आयोजित करण्याचा निर्णय घेतला, अशी प्रतिक्रिया तुकाराम धनावडेंनी व्यक्त केली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com