...तर शिवसेना स्टाईलने आंदोलन

karad
karad

सातारा (जि. सातारा) ः माजी जिल्हाप्रमुख नरेंद्र पाटील हे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते असून, त्यांच्यावर झालेला हल्ल्याचा शिवसेना तीव्र शब्दांत निषेध करते. पुन्हा असा प्रकार झाल्यास कायद्याची भीडभाड न ठेवता सेना स्टाइलने उत्तर देऊ, असा इशारा शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला. 

शिवसेनेच्या शिष्टमंडळाने अतिरिक्त पोलिस अधीक्षक समीर शेख यांची भेट घेतली. या शिष्टमंडळात शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख प्रताप जाधव यांच्यासह सातारा तालुकाप्रमुख दत्ता नलावडे, सातारा शहरप्रमुख बाळासाहेब शिंदे, कोरेगाव शहरप्रमुख अक्षय बर्गे, उपतालुका प्रमुख रमेश बोराटे, धर्मवीर युवा मंचचे अध्यक्ष प्रशांत नलवडे, उपतालुकाप्रमुख जोतिराम गवळी, ऋषिकेश गवळी, संदीप जाधव, सचिन जगताप कपिल शिंदे उपस्थित होते.

या भेटीसंबंधी प्रताप जाधव यांनी दिलेल्या पत्रकातील माहितीनुसार सातारा पालिकेत घडलेला प्रकार अत्यंत निंदाजनक आहे. नरेंद्र पाटील यांना मानणारा एक मोठा वर्ग जिल्ह्यात आहे. सर्वपक्षीय नेत्यांशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. अशा व्यक्तीवर पालिकेत अधिकाऱ्यांसमोरच ठेकेदार हल्ला करतो, ही आतिशय चिंताजनक बाब आहे. या प्रकरणात मुख्याधिकारी गप्प का? शासकीय कामात अडथळा आणला म्हणून पालिकेने ठेकेदाराविरुद्ध गुन्हा दाखल केला पाहिजे. येत्या दोन दिवसांत पालिका प्रशासन व पोलिसांनी संबंधित ठेकेदारावर गुन्हा नोंद करावा व त्यास काळ्या यादीत टाकावे, अन्यथा जिल्ह्यातील शिवसैनिक रस्त्यावर उतरून आंदोलन करतील. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com