esakal | सावित्रीबाईंची नायगावनगरी सजली; जयंतीनिमित्त छगन भुजबळांसह वर्षा गायकवाडांची उपस्थिती
sakal

बोलून बातमी शोधा

सावित्रीबाईंची नायगावनगरी सजली; जयंतीनिमित्त छगन भुजबळांसह वर्षा गायकवाडांची उपस्थिती

शासकीय आदेशाप्रमाणे इतर कोणालाही प्रवेश देण्यात येणार नाही. 

सावित्रीबाईंची नायगावनगरी सजली; जयंतीनिमित्त छगन भुजबळांसह वर्षा गायकवाडांची उपस्थिती

sakal_logo
By
अशपाक पटेल

शिरवळ (जि. सातारा) : क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती नायगाव (ता. खंडाळा) येथे आज (रविवारी) मोठ्या उत्साहाने साजरी होत आहे. अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ व शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उदय कबुले, उपाध्यक्ष प्रदीप विधाते यांच्यासह अधिकारी व पदाधिकारी थाेड्याच वेळेत येथे उपस्थित राहणार आहेत.
 
सावित्रीबाई फुले जयंती निमित्ताने नायगावनगरी सजली आहे. स्मारकास विद्युतीकरण करण्यात आले असून, सर्व स्मारक फुलांनी सुशोभित करण्यात आले आहे. दरम्यान, श्री. भुजबळ आज सकाळी साडेदहा वाजता सावित्रीबाई फुले स्मारकास्थळी येणार असून, शिक्षणमंत्री गायकवाड उपस्थित राहणार आहेत. ग्रामपंचायत निवडणूक आदर्श आचारसंहिता व कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने जय्यत तयारी केली असून, आचारसंहिताचा कोठेही भंग होणार नाही, याची सर्व काळजी घेण्यात आली आहे. मंत्री व मान्यवरांच्या हस्ते स्मारकास अभिवादनाचा कार्यक्रम होणार आहे.

'ती'ची उध्दारकर्ती सावित्रीबाई माझी!

याठिकाणी कोरोनाबाबत दक्षता म्हणून मास्क असणे गरजेचे असणार आहे. शासकीय आदेशाप्रमाणे इतर कोणालाही प्रवेश देण्यात येणार नाही. नायगाव येथे प्रशासनाच्या वतीने जय्यत तयारी झाली आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनोज जाधव यांनी दिली.

Edited By : Siddharth Latkar

loading image