सातारा : नांदलापुरात भंगारच्या दुकानाला लागली आग | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भंगारच्या दुकानाला भीषण आग लागून त्यात टॅंकरही जळाला.

सातारा : नांदलापुरात भंगारच्या दुकानाला लागली आग

मलकापूर - नांदलापूर येथील भर वस्तीतील भंगारच्या दुकानाला आज पहाटे अचानक भीषण आग लागली. शेजारीच असलेला टँकरही त्यात पेटला. आगीमध्ये दुकानाचे मोठे नुकसान झाले. अग्निशमन दलाला तासभर केलेल्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणण्यात यश आले. आगीमध्ये दुकान व साहित्य भस्मसात झाले.

घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, नांदलापूर येथील भरवस्तीतील भंगारच्या दुकानाला आज पहाटे अचानक भीषण आग लागली. मॉर्निंग वॉक करणाऱ्यांसह परिसरातील वस्तीमधील लोकांच्या ही बाब लक्षात आले. त्यांना तत्काळ त्याची माहिती अग्निशमन दलाला दिली. कऱ्हाड पालिकेचे अग्निशामन दल तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी सुमारे तासभर आग विझविण्याचा आटोकाट प्रयत्न केला. त्याचदरम्यान शेजारीच असलेल्या टॅंकरलाही आग लागली. बंब तत्काळ पोचल्याने मोठा अनर्थ टळला. भंगारच्या दुकानाशेजारीच फर्निचरचे दुकान आहे. अग्निशमन दल वेळीच पोचले नसते, तर त्याही दुकानाला मोठा धोका पोचला असता.

टॅग्स :SataracrimefireScrap