esakal | विद्यार्थ्यांसाठी साता-याच्या शिक्षण विभागाची अभिनव कल्पना; फक्त एक फाेन करा
sakal

बोलून बातमी शोधा

विद्यार्थ्यांसाठी साता-याच्या शिक्षण विभागाची अभिनव कल्पना; फक्त एक फाेन करा

त्याअंतर्गत माध्यमिक शिक्षण विभागाने एक पाऊल पुढे टाकत जिल्ह्यातील अशा विद्यार्थ्यांसाठी 20 समुपदेशकांची नियुक्ती केली आहे. त्यांच्यामार्फत विद्यार्थ्यांचा तणाव दूर होण्यासह करिअरसाठी मार्गदर्शन केले जाणार आहे.

विद्यार्थ्यांसाठी साता-याच्या शिक्षण विभागाची अभिनव कल्पना; फक्त एक फाेन करा

sakal_logo
By
हेमंत पवार

कऱ्हाड : ज्या विद्यार्थ्यांकडे मोबाईल नाहीत, असे विद्यार्थी दुसऱ्या विद्यार्थ्यांकडे मोबाईल असल्याने ती अभ्यासक्रमात पुढे गेली, आपण मागे राहिलो, या भावनेतून चिंताग्रस्त बनत आहेत. त्यातून काही जण वैफल्यग्रस्तही होत आहेत. परिणामी विद्यार्थी आत्महत्येसारख्या वाईट घटनांकडे वळत असल्याचे ओंड येथील घटनेतून समोर आले आहे. त्याचा विचार करून शिक्षण विभागाने एक पाऊल पुढे टाकत जिल्ह्यातील अशा विद्यार्थ्यांसाठी 20 समुपदेशकांची नियुक्ती केली आहे. त्यांच्यामार्फत विद्यार्थ्यांचा तणाव दूर होण्यासह करिअरसाठी मार्गदर्शन केले जाणार आहे. 

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सध्या शाळा बंद आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये आणि त्यांना शिक्षण प्रवाहात ठेवण्यासाठी शासनाने ऑनलाइन शिक्षणाची कार्यवाही सुरू केली आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांना घरबसल्या मोबाईलवर अभ्यासक्रम शिकवला जात आहे.

संशयाचं भूत..!
 
मात्र, जिल्ह्यातील तब्बल सुमारे दोन लाख दोन हजार 400 विद्यार्थी ऑनलाइनच्या प्रवाहातच नाहीत, हे वास्तव शिक्षण विभागाच्या पाहणीतून समोर आले आहे. त्यामुळे मोबाईल असणारे विद्यार्थी आणि नसणारे अशी दरी विद्यार्थ्यांत निर्माण झाली आहे. त्यामुळे मोबाईल असणारे विद्यार्थी अभ्यासक्रमात पुढे गेले, आपण मागे राहिलो, ही भावना मोबाईल नसणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मनात आहे. त्यामुळे ते विद्यार्थी चिंताग्रस्त बनत आहेत. त्यातून काही जण वैफल्यग्रस्तही होत आहे. परिणामी विद्यार्थी टोकाचे पाऊल उचलत असल्याचे ओंड येथील घटनेतून समोर आले आहे. त्यामुळे आता अशा विद्यार्थ्यांसाठी शिक्षण विभागाने उपाययोजना हाती घेतल्या आहेत. त्याअंतर्गत माध्यमिक शिक्षण विभागाने एक पाऊल पुढे टाकत जिल्ह्यातील अशा विद्यार्थ्यांसाठी 20 समुपदेशकांची नियुक्ती केली आहे. त्यांच्यामार्फत विद्यार्थ्यांचा तणाव दूर होण्यासह करिअरसाठी मार्गदर्शन केले जाणार आहे.

शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी साता-यात शिक्षण विभागाचा ऑफलाइन कृतिपत्रिकांचा पर्याय 


""ऑनलाइनची साधने नसणारे विद्यार्थी चिंताग्रस्त होत आहेत. अन्य काही कारणांमुळे विद्यार्थी वैफल्यग्रस्त होत आहेत. त्यांच्या प्रबोधनासाठी जिल्ह्यात 20 समुपदेशकांची नियुक्ती केली आहे. ते विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतील.'' 

- राजेश क्षीरसागर, शिक्षणाधिकारी, माध्यमिक 


...हे आहेत जिल्ह्यातील समुपदेशक 

कृष्णा बोराटे (कटगुण ः 9657280922)

जगदीश निर्मळे (दरुज ः 8208963766)
 
आण्णा शिंदे (चंचळी ः 9975019204)

सतीश चव्हाण (कोरेगाव ः 7387136925)

हमीद इनामदार (शिरढोण ः 9823938379)

संभाजी पाटील (शिवथर-आरफळ ः 9860119244)

सुनीता केदार (शिवथर-आरफळ ः 9881798790)

विजया निकम (पाटखळ ः 9822331806)

संताजी चव्हाण (सातारा ः 9011867644)

सुरेश काटकर (वारुगड ः 8805352448)

शांतीनाथ मल्लाडे (कऱ्हाड ः 9922211564)

प्रदीप वाघ (गुळुंब ः 9822536151)

रियास महाफुले (महाबळेश्वर ः 9423862868)

सुनील क्षीरसागर (फलटण ः 9423826900)

गोपाळराव जाधव (फलटण ः 9420241929)

मनोहर तांबे (जांभुळणी ः 9604697749)

मानसिंग पवार (खराडे ः 9822601085)

राजेंद्र ओगले (विंग ः 9766328295)

प्रमोद नलगे (करंजखोप ः 7721883443)

एस. आर. पाटील (आटके ः 9822182312)

Edited By : Siddharth Latkar

loading image
go to top