लायन्स क्लब सातारा एमआयडीसीचे 12 ऑक्सिजन मशीन कार्यरत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Lions Club Satara

आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते लायन्स क्लब सातारा एमआयडीसीचे 12 ऑक्सिजन मशिन्स लोकांच्या सेवेत रुजू झाल्या.

लायन्स क्लब सातारा एमआयडीसीचे 12 ऑक्सिजन मशीन कार्यरत

सातारा : आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते लायन्स क्लब सातारा एमआयडीसीचे 12 ऑक्सिजन मशिन्स लोकांच्या सेवेत रुजू झाल्या. यावेळी आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी लायन्स क्लब सातारा एमआयडीसीच्या या उपक्रमाचे कौतुक करताना सध्याच्या कोरोना पार्श्वभूमीवर उद्भवलेल्या कठीण प्रसंगी लोकांच्या सेवेसाठी अतिशय उपयुक्त प्रकल्प हाती घेतल्याबद्दल अभिनंदन केले. लोकांना सहकार्य करण्याच्या क्लबच्या सर्व उपक्रमांना लागेल ती मदत देण्याचे आश्वासन ही दिले. 

आपल्या जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्या तुलनेत ऑक्सिजनचे बेड उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे अनेकांना घरीच ऑक्‍सिजन लावायची वेळ आली आहे. या गंभीर परिस्थितीचा विचार व सामाजिक बांधिलकीचा विचार करून Oxygen Concentrator Machines तातडीने उपलब्ध व्हावे, यासाठी लायन्स क्लब ऑफ सातारा एमआयडीसी ने पुढाकार घेऊन ऑक्‍सिजन ग्रुप तयार केला आहे.

या ग्रुप मार्फत ऑक्‍सिजन यंत्रे गरजूंना वैद्यकीय सल्ल्यानुसार मोफत वापरण्यासाठी देण्यात येणार आहेत. क्लबचे 12 मशिन्सचे उद्दिष्ट होते व आतापर्यंत 12 मशिन्स मागविण्यात आल्या आहेत. गरज पडली तर अजून मशिन्स मागविणार आहोत. लायन्स क्लब सातारा अजिंक्यने ही उपक्रमात सहभागी होत 2 मशिन्स देण्याचे ठरविले आहे, असे कळविण्यात आले आहे.

यावेळी क्लबचे संस्थापक लायन राजेंद्र मोहिते, क्लबचे अध्यक्ष लायन लोकेश उत्तेकर, उपाध्यक्ष लायन आनंदा गायकवाड, सचिव लायन शिवाजीराव फडतरे, ट्रेझरर व प्रकल्प प्रमुख लायन केतन कोटणीस, लायन्स क्लब सातारा एमआयडीसीचे सर्व सदस्य उपस्थित होते.

गरजू लोकांनी मशीनसाठी संपर्क करावा...

ला. लोकेश उत्तेकर        ९४२१८८४००३
ला. केतन कोटणीस        ९८२२२९४८९८
ला. राजेंद्र मोहिते            ९८२२३७९०६५
ला. शिवाजीराव फडतरे    ७५८८६३७६२६

संपादन - सुस्मिता वडतिले 

Web Title: Service People Lions Club Satara Has Started 12 Oxygen Machines Midc

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Satara