जिगरबाज महाराष्ट्र पाेलिसांची हरियाणात धडाकेबाज कामगिरी

सिद्धार्थ लाटकर | Tuesday, 20 October 2020

सातारा पोलिस दलाचे शाहूपूरी विभागाचे एक पथक हरियाणा राज्यात रवाना झाले होते. या पथकाने स्थानिक पोलिसांच्या मदतीने आरोपींबाबत माहिती प्राप्त करून आरोपी पळून जात असताना पाठलाग करून दोघांना ताब्यात घेतले.

सातारा : महाराष्ट्रासह गुजरात, कर्नाटक, मध्यप्रदेश, हरियाणा, राजस्थान, उत्तर प्रदेश येथे एटीएम मशीनमधील लाखो रुपयांवर चाेरणा-या आंतरराज्य टोळीचा येथील  शाहूपुरी पोलिसांनी छडा लावला आहे. विशेष म्हणजे सातारा पाेलिस विभागातील धाडसी अधिकारी आणि कर्मचारी यांनी संबंधित संशयित आराेपींना हरियाणात जाऊन तेथून पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना पाठलाग करून पकडले आहे.

या संशयित आराेपींकडून दोन लाख रुपये आणि वाहन जप्त करण्यात आले आहे. सकरुद्दीन फैजरू (रा. घागोट, ता. जि. पलवल, हरियाणा) आणि रवी ऊर्फ रविंदर चंदरपाल (रा. मोहननगर, पलवल रेल्वेस्टेशनजवळ ता. पलवल हरियाणा) अशी अटक
केलेल्यांची नावे आहेत.

पर्यटनाचा घ्या मनसोक्त आनंद! महाबळेश्‍वर, पांचगणीतील पॉईंट खुले  

सातारा शहरातील राधिका चौकातील कॅनरा बँकेच्या एटीएममधून अनोळखी व्यक्तींनी
२० व २१ सप्टेंबरला एटीएमधून हातचलाखीने दाेन लाखांची रक्कम काढून बँकेची फसवणूक केली होती.  याबाबत माहिती घेतांना जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून एटीएममधून हातचलाखीने मोठ्या प्रमाणावर रोख रकमा काढण्याचे प्रकार
होत असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले.

टॉप टेन गुन्हेगारांची यादी तयार : अजयकुमार बन्सल

या गुन्ह्याच्या तपासामध्ये संशयित आरोपी हरियाणा राज्यातील असल्याची व त्यांनी महाराष्ट्रासह गुजरात, कर्नाटक, राजस्थान, मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश, हरियाणा राज्यात मोठ्या प्रमाणावर एटीएमवर डल्ला मारल्याची धक्कादायक माहिती समोर आली होती.

नियम मोडणाऱ्यांवर कारवाईचा बडगा; पोलिसांकडून 19 लाखांची वसुली

या माहितीनुसार सातारा पोलिस दलाचे शाहूपूरी विभागाचे एक पथक हरियाणा राज्यात रवाना झाले होते. या पथकाने स्थानिक पोलिसांच्या मदतीने आरोपींबाबत माहिती प्राप्त करून आरोपी पळून जात असताना पाठलाग करून दोघांना ताब्यात घेतले. दरम्यान संबंधित संशयित आराेपींना साता-यात आणल्यानंतर सातारा पाेलिस दलाने सहायक पाेलिस निरीक्षक संदीप शिताेळे, काॅन्सटेबल माेहन पवार, पाेलिस नाईक स्वप्नील कुंभार, काॅन्सटेबल पंकज माेहिते या पथकाचे फटाके फाेडून, सातारी कंदी पेढे भरवून धडाक्यात स्वागत केले. यावेळी सहायक पाेलिस अधीक्षक आंचल दलाल यांनी पथकास शुभेच्छा दिल्या.