भाजपचा कायदा हातात घेण्याचा इशारा; गृहराज्यमंत्र्यांचे सातारकरांना शांततेचे आवाहन

उमेश बांबरे | Saturday, 9 January 2021

विघातक प्रवृत्तींवर कठोर कारवाई व्हावी यासाठी मी स्वतः आग्रही आहे. शिवप्रेमी जनतेने शांतता राखावी असे आवाहन गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी केले आहे. 

सातारा : साता-यातील  ग्रेड सेपरेटरवरील (भुयारी मार्ग) छत्रपती संभाजीराजे भुयारी मार्ग असा लावलेला फलक अज्ञात व्यक्तींनी फाडल्याच्या घटनेचा निषेध राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी येथे केला. या प्रकरणी अज्ञात व्यक्ती विरूध्द गुन्हा दाखल करण्याची सूचना पोलिस अधीक्षकांना केली आहे. विघातक प्रवृत्तींना पोलिसांनी शोधून काढून त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचे आश्वासन देऊन सातारकर (Satara) जनतेने शांतता राखावी, असे आवाहनही केले आहे.
सातारा जिल्ह्यातील बातम्या वाचा 

साताऱ्यातील ग्रेड सेपरेटरचे खासदार उदयनराजे भाेसले (Udayanraje Bhosale) यांनी शुक्रवारी (ता.८) उद्‌घाटन केले. या ग्रेड सेपरेटरवरील भितींवर थाेर महापुरुषांची नावे असलेले फलक लावण्यात आले. त्यापैकी श्रीमंत छत्रपती संभाजीराजे भुयारी मार्ग या नावाचा असलेला फलक शुक्रवारी रात्री कोणीतरी फाडला. हा प्रकार शनिवारी (ता.९) सकाळी सातारकरांच्या निदर्शनास आला. यावेळी उदयनराजेप्रेमींनी देखील घटनेचा निषेध नाेंदविण्यासाठी पाेवई नाक्यावर गर्दी केली. सकाळी नऊपासून सातारा शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पाेलिसांनी घटनास्थळी जाऊन जमलेल्या युवा वर्गास शांत केले.

माताजी ओ काळम्मावाडी का धोंडा आपने बिठाया था उसका क्या हुआ? अशी काेल्हापूरकरांनी इंदिराजींना आठवण करुन देताच सुटला धरणाचा प्रश्न 

Advertising
Advertising

या घटनेच्या पार्श्वभूमीवर गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांच्याशी पत्रकारांनी संवाद साधला. त्यावर मंत्री देसाई म्हणाले, ग्रेड सेपरेटरचे नामकरण शुक्रवारी झाले होते. थोर विभुतींची नावे या भुयारी मार्गाला दिली होती. त्यापैकी एका फलकाला इजा पोचविली आहे.  हा प्रकार अत्यंत दुर्दैवी आणि निंदनीय आहे. मला हा प्रकार समल्यावर मी तातडीने सर्व पोलिस अधिकाऱ्यांना घटनास्थळी पाठविले. तसेच अज्ञात व्यक्तीविरूध्द तातडीने गुन्हा दाखल करा, अशा सूचना दिल्या. संबंधित व्यक्तीचा शोध पाेलिस घेतीलच. परंतु अशा विघातक प्रवृत्तींवर कठोर कारवाई व्हावी यासाठी मी स्वतः आग्रही आहे. शिवप्रेमी जनतेने शांतता राखावी असे आवाहन मंत्री देसाई यांनी केले आहे. 

मी पाचवडला जाऊन येतो, असे सांगून घरा बाहेर पडलेल्या मुलाचा झाला खून! 

दरम्यान ज्या समाजकंटकांनी ग्रेड सेपरेटरमधील भुयारी मार्गास छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव दिलेला फलक फाडला आहे, त्यांचा पोलिसांनी तातडीने शोध घ्यावा. त्यांना कडक शासन  करावे अन्यथा भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना कायदा हातात घ्यावा लागेल, असा इशारा भारतीय जनता पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब गोसावी यांनी दिला आहे. 

साताऱ्यातील ग्रेड सेपरेटर या बहुचर्चित प्रकल्पाचे उद्घाटन भाजपचे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी केले. याचा पोटशूळ जर कोणाला उठला असेल आणि छत्रपतींच्या थेट चौदाव्या वंशज यांनी दिलेले छत्रपती संभाजी महाराजांचे नाव या शाहूनगरीत ज्या प्रवृत्तींना आवडले नाही त्यांनी आपली थोबडे पहिली काळी करून घ्यावीत. ज्या छत्रपती शिवरायांच्या भूमीत हा प्रकल्प झाला त्याला संभाजी महाराजांचे नाव घेऊन खऱ्या अर्थाने या प्रकल्पाला वैभव प्राप्त झाले आहे. असे असताना ज्या प्रवृत्तींनी हा फलक पाडला या प्रवृत्ती पाकिस्तानातून आलेल्या आहेत काय असा सवालही गोसावी यांनी केला आहे.  या घटनेचा मी सातारा जिल्हा भारतीय जनता पार्टीच्यावतीने जाहीर निषेध करतो. तसेच यासंदर्भात आम्ही जिल्हाधिकारी शेखर सिंह यांची भेट घेणार असून त्यांनाही निवेदन देणार आहोत. प्रशासनाने तातडीने परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून ज्या समाजकंटकांनी हे क्रुत्य केले त्यांना तातडीने अटक करावी, अशी आमची मागणी आहे. याबाबत तातडीने कार्यवाही न झाल्यास जिल्हाभर भारतीय जनता पार्टीच्यावतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. असा इशाराही गोसावी यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे दिला आहे.

महापुरुषाच्या नावाचा फलक फाडल्याप्रकरणी उदयनराजे समर्थक आक्रमक