esakal | मै हूं ना! महाबळेश्वरातील पर्यटकांना गृहराज्यमंत्र्यांचा दिलासा

बोलून बातमी शोधा

मै हूं ना! महाबळेश्वरातील पर्यटकांना गृहराज्यमंत्र्यांचा दिलासा}

​जावली तालुक्यातील 56 गावे मेढा पोलिस ठाण्या ऐवजी ती महाबळेश्वर पोलिस ठाण्याला जोडण्याचा निर्णय घेण्यात आला परंतु त्या प्रमाणात पोलिस कर्मचारी यांची संख्या वाढविण्यात आली नाही. याकडे लक्ष वेधले असता मंत्री देसाई म्हणाले, स्थानिक लोकांनी केलेल्या मागणीची दखल घेऊन मेढा पोलिस ठाण्याकडे असलेली 56 गावे ही महाबळेश्वर पोलिस ठाण्याकडे वर्ग करण्यात आली. लवकरच त्याप्रमाणात पोलिस कर्मचारी महाबळेश्वर पोलिस ठाण्याला देण्यात येतील.

मै हूं ना! महाबळेश्वरातील पर्यटकांना गृहराज्यमंत्र्यांचा दिलासा
sakal_logo
By
अभिजीत खूरासणे

महाबळेश्वर (जि. सातारा) :  महाबळेश्वर पाचगणी आदी पर्यटन स्थळावर होत असलेल्या वाहतुक कोंडीची गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी स्वतः शनिवारी वरीष्ठ पोलिस अधिका-यांसमवेत केली. या वाहतुक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी तात्काळ उपाययोजना करण्याच्या सुचना मंत्री देसाई यांनी दिल्या.
पर्यटकांनाे! महाबळेश्वर, पाचगणीला आलात 'हे' नियम पाळा 

विविध हंगामात व विकेंडला महाबळेश्वर व पांचगणी येथे पर्यटकांची गर्दी होते. या गर्दीमुळे महाबळेश्वर व पांचगणी या दोन्ही पर्यटन स्थळांवर तसेच महाबळेश्वर पांचगणी दरम्यान अनेक ठिकाणी वाहतुकीची कोंडी होते. सहलीसाठी आलेल्या पर्यटक या वाहतुकीच्या कोंडीत तासनतास अडकुन पडतात. याबाबत पर्यटकांच्या व स्थानिक नागरीकांच्या तक्रारीत वाढ होत आहे. या तक्रारींची दखल खुद्द् गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई यांनी घेतली. त्यांनी वरीष्ठ पोलिस अधिकारी व स्थानिक पोलिस अधिकारी यांना सोबत घेवुन भाेसे ते महाबळेश्वर दरम्यान ज्या ज्या ठिकाणी वाहतुकी कोंडी होते अशा ठिकाणांना भेटी दिल्या. मॅप्रो गार्डन येथे थांबुन त्यांनी पाहणी केली. येथे वाहतुकीची कोंडी का होते या बाबत तेथील स्थानिक ग्रामस्थ तसेच मॅप्रो कंपनीचे व्यवस्थापक यांचे बरोबर चर्चा करून पोलिसांना सुचना केल्या. त्यानंतर मंत्री देसाई हे वेण्णालेक येथे पाेचले. त्यांनी वेण्णालेक येथील वाहनतळाची पाहणी केली. या वाहनतळाबाबत पालिकेच्या मुख्याधिकारी पल्लवी पाटील यांनाही आवश्यका त्या उपाययाेजना करण्याचे सांगितले. येथुन महाबळेश्वरला जाणारा पर्यायी मार्ग काढण्यात येणार आहे त्या मार्गाची पाहणी मंत्री देसाई यांनी केली.

टोल चुकविणा-यांच्या 'आयडिया' फसल्या; पोलिस खात्यावर व्यवस्थापन नाराज

वेण्णालेक येथे त्यांनी काही पर्यटकांशी संवाद साधला व महाबळेश्वर कसे वाटले? येथे काही अडचणी आहेत का? वेण्णालेक येथील व्यवस्था कशी आहे? याबाबत त्यांचे मत जाणुन घेतले. पर्यटकांनी सोई सुविधांबाबत समाधान व्यक्त केले. देसाई यांनी मधुसागर या सह मधोत्पादक संस्थेला भेट दिली. तेथुन ते थेट बाजारपेठेत आले. बाजारपेठेत पायी चालत त्यांनी बाजारपेठेत पर्यटकांना व स्थानिक व्यापारी यांना काही अडचणी आहेत का याची पाहणी केली. त्यांनी या वेळी काही स्थानिक व्यापारी व पर्यटक यांचे बरोबर संवाद साधला. त्यानंतर येथील हनुमान मंदीरात दर्शन घेतले व ते थेट लेक व्हयु हॉटेल गाठले. या ठिकाणी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

प्रा. एन. डी.- सरोजताई यांना शरद- प्रतिभा पुरस्कार जाहीर

ते म्हणाले, गेली अनेक वर्षे महाबळेश्वर व पांचगणी करांना वाहतुकीच्या कोंडीने ग्रासले आहे. या बाबत वाढत्या तक्रारी आल्याने आपण आज या वाहतुकीच्या कोंडीची समक्ष पाहणी केली. ही वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी तात्काळ उपाय योजना करण्याच्या सुचना आपण वरिष्ठ पोलिस अधिकारी यांना दिल्या आहेत. काही ठराविक ठिकाणीच वाहतुकीची कोंडी होते परंतु त्या ठिकाणी वाहतुकीची कोंडी होवु नये म्हणुन त्या ठिकाणी जादा वाहतुक पोलिस नेमण्याच्या सुचना करण्यात आल्या आहेत. महाबळेश्वर व पांचगणी येथील पोलिसांनी पेट्रोलिंग करावे अशा सुचनाही पोलिसांना करण्यात आल्या आहेत. वेण्णालेक येथे असलेल्या वाहनतळावर नियोजनाचा अभाव आहे या बाबत आपण पालिकेच्या मुख्याधिकारी यांना सुचना दिल्या आहेत. या वाहनतळावर वाहने आत व बाहेर पडण्याचे दोन स्वतंत्र मार्ग असावेत अशा सुचनाही आपण पालिकेला केल्याची माहिती मंत्री देसाई यांनी दिली. यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख यशवंत घाडगे, माजी नगराध्यक्ष डी.एम. बावळेकर, शिवसेना माजी जिल्हा प्रमुख राजेश कुंभारदरे, शिवसेना तालुका प्रमुख संतोष जाधव, शिवसेना शहर प्रमुख महेश गुजर आदी मान्यवर उपस्थित होते.

ग्रामस्थ खूश; उद्योजकाने उभारले 15 वनराई बंधारे

Edited By : Siddharth Latkar