तेरे जैसा यार कहां! पावसातील सभेनंतर शरद पवार अन् श्रीनिवास पाटलांची 'मैत्री' पुन्हा बहरली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sharad Pawar

कऱ्हाडात आज खासदार श्रीनिवास पाटील यांच्या निवासस्थानी दोन मित्रांच्या झालेल्या भेटीमुळे उपस्थितही भारावून गेले.

पावसातील सभेनंतर शरद पवार अन् श्रीनिवास पाटलांची 'मैत्री' पुन्हा बहरली

कऱ्हाड (सातारा) : ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) व खासदार श्रीनिवास पाटील (MP Shrinivas Patil) यांच्या मैत्रीची (Friendship) ख्याती आहे. कऱ्हाड येथे आज खासदार श्रीनिवास पाटील यांच्या निवासस्थानी दोन मित्रांच्या झालेल्या भेटीमुळे उपस्थितही भारावून गेले. साठ वर्षाहून अधिक जपलेले मैत्रीचे बंध यानिमित्ताने पुन्हा बहरल्याचे दिसून आले.

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (Nationalist Congress Party) अध्यक्ष शरद पवार यांनी खासदार श्रीनिवास पाटील यांच्या गोटे येथील लोकसेवा जनसंपर्क कार्यालयास सदिच्छा भेट दिली. त्यांनी सातारा लोकसभा मतदारसंघातील (Satara Lok Sabha Constituency) कार्यप्रणालीवर समाधान व्यक्त केलं. शरद पवार जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी ज्येष्ठ नेते (कै.) यशवंतराव चव्हाण (Yashwantrao Chavan) यांच्या समाधीस्थळास अभिवादन केलं. त्यानंतर त्यांनी गोटे येथील खासदार पाटील यांच्या लोकसेवा जनसंपर्क कार्यालयास सदिच्छा भेट दिली. यावळी शरद पवार यांनी सातारा लोकसभा मतदारसंघातील नागरिकांसाठी कार्यालयातून चालणाऱ्या दैनंदिन कामकाजाची सविस्तर माहिती सारंग पाटील यांच्याकडून जाणून घेतली.

हेही वाचा: 'भाजपला सोबत घेतल्यामुळं 'राष्ट्रवादी'चं कोणतंही नुकसान झालं नाही'

संपूर्ण जिल्हाभरातून दररोज येणाऱ्या नागरिकांचे सोडविले जाणारे सामाजिक व वैयक्तिक प्रश्न, त्यांच्या अडीअडचणी त्यासाठी माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून कार्यालयात राबवण्यात आलेली तांत्रिक कार्यप्रणाली, त्यातून आणलेली सुव्यवस्था पाहून खासदार पवार यांनी समाधान व्यक्त केलं. तसेच सारंग पाटील हे नियमितपणे मतदारसंघातील गावागावात जावून प्रत्यक्ष गाव भेट देत आहेत. तेथील स्थानिक नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्याच्या सोडवणुकीसाठी ते प्रयत्नशील राहत असल्याचे ऐकून सारंग पाटील यांचे त्यांनी विशेष कौतुक केलं. यावेळी पालकमंत्री बाळासाहेब पाटील, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष धीरज शर्मा, रजनीदेवी पाटील, सारंग पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने उपस्थित होते.

हेही वाचा: DCC Bank Election : साताऱ्यात लवकरच राजकीय भूकंप?

शरद पवार आणि श्रीनिवास पाटील यांची गेली 60 वर्षांची मैत्री. आपल्या या मित्राला शरद पवार यांनी दुसऱ्यांदा हाक दिली आणि त्यांनी काहीही पुढे मागे न पहाता मित्राला साथ देत झोकून दिले आणि ठरले जायंट किलर. होय, श्रीनिवास पाटील यांनी दुसऱ्यांदा आपल्या मित्रासाठी जीवाची बाजी लावत परिवर्तन घडवून आणले. साताऱ्यातून खासदार उदयनराजे भोसले यांचा पराभव करीत राज्यात एकच खळबळ उडवून दिली होती. शरद पवार आणि श्रीनिवास पाटील यांची बीएमसीसी कॉलेजपासून मैत्री आहे. शरद पवार यांच्या कॉलेजमधील काही मोजक्या मित्रांपैकी एक पाटील एक आहे. शरद पवार राजकारणात गेले आणि स्पर्धा परीक्षा पास होऊन श्रीनिवास पाटील सरकारी अधिकारी झाले. राज्यात अनेक ठिकाणी त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांसह वेगवेगळ्या पदावर काम केले, तरी पवार यांच्याबरोबरची मैत्री कायम राहिली.

हेही वाचा: देवेंद्र फडणवीस, राज ठाकरेंच्या भेटीवर देशपांडेंची 'मनसे' प्रतिक्रिया

loading image
go to top