esakal | शरद पवारांच्या सातारा दौऱ्याला आमदारांनी खो घातला? पालकमंत्र्याची चुप्पी

बोलून बातमी शोधा

शरद पवारांच्या सातारा दौऱ्याला आमदारांनी खो घातला? पालकमंत्र्याची चुप्पी}

येत्या प्रजासत्ताक दिनी (ता. 26) सकाळी दहा वाजता ग्रेड सेपरेटरचे उद्‌घाटन होईल अशी माहिती पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिली.

शरद पवारांच्या सातारा दौऱ्याला आमदारांनी खो घातला? पालकमंत्र्याची चुप्पी
sakal_logo
By
उमेश बांबरे

सातारा : स्थानिक स्वराज्य संस्थांची आचारसंहिता त्यानंतर ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची आचारसंहिता असल्याने साताऱ्यातील ग्रेड सेपरेटरचे उद्‌घाटन करता आले नव्हते. आता आचारसंहिता संपली असल्याने येत्या प्रजासत्ताक दिनी ग्रेड सेपरेटरचे उद्‌घाटन होईल. त्यासाठी जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींना निमंत्रण दिले जाईल, अशी माहिती पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिली.
 
ग्रेड सेपरेटरच्या उद्‌घाटनावरून सध्या साताऱ्यात खासदार उदयनराजे भोसले व जिल्हा प्रशासन यांच्या कलगीतुरा रंगला आहे. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री पाटील यांच्याकडून पत्रकारांनी नुकतीच नेमकी भूमिका जाणून घेतली. श्री. पाटील म्हणाले, ""साताऱ्यातील ग्रेड सेपरेटरचे काम हे केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून करण्यात आले आहे. तत्कालीन बांधकाममंत्री छगन भुजबळ यांनी याबाबतचा निर्णय घेतला होता. आता ग्रेड सेपरेटरचे काम पूर्ण झाले आहे. यामुळे सातारा शहरातील वाहतुकीचा ताण कमी होणार आहे. शहरातून बाहेर महामार्गावर जाणाऱ्यांना भुयारी मार्ग सोयीचा होणार आहे. याच्या उद्‌घाटनाची चर्चा अनेक दिवसांपासून होती. मध्यंतरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची आचारसंहिता सुरू होती. ती संपतेय तोच ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची आचारसंहिता सुरू झाली. त्यामुळे उद्‌घाटन पुढे गेले होते. आता आचारसंहिता संपलेल्या आहेत. त्यामुळे येत्या प्रजासत्ताक दिनी (ता. 26) सकाळी दहा वाजता याचे उद्‌घाटन होईल. त्यासाठी आम्ही गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई, तसेच दोन्ही खासदार व सर्व आमदार, तसेच या जिल्ह्याशी संबंधित सर्व लोकप्रतिनिधींना निमंत्रण देऊन उद्‌घाटन केले जाईल.'' 

उदयनराजेंनी शरद पवारांपासून तुम्हा सर्वांना उद्‌घाटनासाठी बोलावले होते. शरद पवारांच्या दौऱ्याला साताऱ्यातील आमदारांनी खो घातला का, या प्रश्नावर श्री. पाटील यांनी अधिक बोलणे टाळत आचारसंहितेमुळेच आम्ही उद्‌घाटन करणे टाळले होते, असे सांगितले. राजकीय श्रेय वादाचा प्रकार असल्याने दोन वेळा उद्‌घाटन झाल्याचा आरोप उदयनराजेंकडून होत आहे, अशावर मंत्री पाटील यांनी केंद्र व राज्य शासनाच्या नियमानूसार आम्ही या कामाचे उद्‌घाटन घेतल्याचे सांगत अधिक बोलणे टाळले.

महाबळेश्वरच्या विकासात योगदान देणाऱ्या राष्ट्रवादीच्या नेत्यास पालिकेने डावलले

सातारा पालिका निवडणुक लढण्यासंदर्भात शरद पवारांचा कार्यकर्त्यांना सल्ला

Edited By : Siddharth Latkar