कऱ्हाडातील शिवसैनिक उद्धव ठाकरेंसोबत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Shiv Sainik With Uddhav Thackeray in Karhada

कऱ्हाडातील शिवसैनिक उद्धव ठाकरेंसोबत

कऱ्हाड - उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांना जेवढे प्रेम महाराष्ट्रातून मिळाले, तेवढे कोणत्याही मुख्यमंत्र्यांना मिळाले नाही, हीच खरी शिवसेनेची ताकद आहे. त्या बळावर पक्षाला पुन्हा उभारी घ्यायची आहे, असे आवाहन शिवसेना भवनातून आलेले पक्षनिरीक्षक संजय गायकवाड यांनी केले. प्रमुख पदाधिकाऱ्यांची आज (रविवारी) येथे बैठक पार पडली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी बहुतांशी पदाधिकाऱ्यांनी पक्षासहित उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेऊन तो जाहीरही केला.

पक्षनिरीक्षक गायकवाड म्हणाले, ‘ज्यावेळी पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला, त्यावेळी महाराष्ट्रातील प्रत्येक घरामध्ये त्यांच्याबद्दल प्रेम व आत्‍मियता बघायला मिळाली. ज्या लोकांचा राजकारणाशी संबंध नाही, त्यांनीसुध्दा उध्दवजींच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर पोस्ट लिहिल्या. काहींनी त्यांच्या फोटोचे स्टेटस ठेवले. त्यादिवशी महाराष्ट्रातील अनेकांना अश्रू अनावर झाले. हळहळ व्यक्त झाली. एवढे प्रेम महाराष्ट्रातील कोणत्याही मुख्यमंत्र्यांना आत्तापर्यंत मिळाले नाही, त्यामुळे आपल्याकडे पक्षप्रमुखावर अपार श्रध्दा व प्रेम करणारी जनतेचा आशीर्वाद आहे.’

शिवसेनेचे जिल्हाप्रमुख जयवंत शेलार म्हणाले, जे आमदार पक्षाशी बंडखोरी करून गेलेत, त्यांना पक्षाने आत्तापर्यंत सर्व काही दिले आहे. सामान्य शिवसैनिकांच्या तुलनेत सर्व दिले तरीसुध्दा पदासाठी देवमाणसासारख्या पक्षप्रमुखांचा विश्वासघात केला गेला. ते तिकडे गेलेत, ते जनतेला आवडलेले नाही, त्यामुळे योग्य वेळी जनताच त्यांना धडा शिकवेल. मात्र, आत्ता पक्षाला साथ देण्याची गरज आहे. यावेळी जिल्हासंघटिका अनिता जाधव, दक्षिण तालुकाप्रमुख नितीन काशीद व शशिकांत हापसे यांनी मनोगत व्‍यक्‍त केले.

शहरप्रमुख शशिराज करपे, मधुकर शेलार, उपजिल्हा संघटिका कविता यादव, उपतालुकाप्रमुख दिलीप यादव, काकासाहेब जाधव, संजय चव्हाण, शहाजी जाधव, माणिक आत्तारकर, उत्तम जाधव, सूर्यकांत पाटील, ऋषीकेश महाडिक, उपशहरप्रमुख साजीद मुजावर, शेखर बर्गे, दीपक मिट्टल, नीलेश सुर्वे, युवासेना शहरप्रमुख अक्षय गवळी, शिवसामर्थसेना जिल्हाप्रमुख प्रमोद वर्णेकर, प्रसिद्धीप्रमुख अजित पुरोहित, शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष उपजिल्हाप्रमुख राजेंद्र माने, शिक्षकसेना जिल्हाध्यक्ष ज्योतीराम साळी, युवासेना तालुकाप्रमुख मोहसीन शेख, विभागप्रमुख अमोल कणसे-पाटील, महेश कोळी, नीलेश पारखे, धनाजी पाटणकर उपस्थित होते.

कऱ्हाड, पाटणचे पदाधिकारी पक्षासोबत

कऱ्हाड, पाटण तालुक्यांतील शिवसेनेचे ९० टक्के पदाधिकारी पक्षासोबत आहेत. शिंदे गटाच्या हाताला कोण लागले आहे, याची जोरदार चर्चा होती. मात्र, आजच्या बैठकीतील उपस्थितीने त्यावरही पडदा पडला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ झालेली फ्लेक्सबाजी व त्यानंतर संतप्त झालेले शिवसैनिक यामुळे वातावरण ढवळले होते. त्यामुळे आजच्या निरीक्षकांच्या बैठकीकडे विशेष लक्ष होते. त्यात बहुतांशी शिवसैनिकांनी पक्षासोबत राहण्याचे निश्चीत केल्याचे त्यांच्या उपस्थितीने जाणवून दिले.

Web Title: Shiv Sainik With Uddhav Thackeray In Karhada

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..