सदाभाऊंच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहू : नगरविकासमंत्री शिंदे

Eknath Shinde
Eknath Shindeesakal
Summary

'शिवसेना या चार अक्षरामुळं मला जीवनात सर्व काही मिळालं.'

मेढा (सातारा) : आमदार नसतानाही आमदार असल्यासारखे जनतेसाठी पळता, भाऊ तुम्ही शिवसेनेच्या माध्यमातून जनतेसाठी जीव ओतून काम करता म्हणून तुमच्या पाठीशी कायम खंबीरपणे उभा राहणार असल्याचे आश्‍वासन नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी दिले.

आमदार सदाशिवराव सपकाळ (Sadashivrao Sapkaal) यांच्या एकसष्ठी सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai), शिवसेना पश्चिम महाराष्ट्र समन्वयक माजी आमदार दगडुदादा सकपाळ, खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर, उपनेते नितीन बानुगडे-पाटील, आमदार महेश शिंदे, माजी आमदार आनंदराव पाटील, हणमंतराव साळुंखे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील, ज्येष्ठ नेते साहेबराव पवार, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे, शिवसेना क्षेत्रप्रमुख एस. एस. पार्टे, संपर्कप्रमुख एकनाथ ओंबळे, डी. एम. बावळेकर, अमित कदम आदी उपस्थित होते.

Eknath Shinde
समान नागरी कायदा घटनाबाह्य, मुस्लिमांना तो मान्य नाही : मुस्लिम बोर्ड

शंभूराज देसाई म्हणाले, ‘‘पश्चिम महाराष्ट्रातील (Western Maharashtra) पहिले शिवसेना (Shiv Sena) आमदार असल्याने सदाशिव सपकाळ हे बाळासाहेबांचे लाडके आमदार होते. त्यांच्या शब्दाला सरकार दरबारी मोठा मान होता. सदाभाऊंचा त्यावेळी मंत्रिपदावर हक्क होता. कृष्णा खोरे महामंडळाच्या माध्यमातून सदाभाऊंनी अनेक धरणांची पायाभरणी केली. युती शासनाच्या काळात पश्चिम महाराष्ट्रात जी धरणं झाली, त्यासाठी सगळे प्रयत्न सदाभाऊंचे आहेत.’’ सत्काराला उत्तर देताना सदाशिव सपकाळ म्हणाले, ‘‘शिवसेना या चार अक्षरामुळे मला जीवनात सर्व काही मिळाले. आता पदाची अपेक्षा नाही. फक्त जनतेसाठी काम करत राहणे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे हात बळकट करणे व बोंडारवाडी धरणाची निर्मिती करणे एवढंच ध्येय उराशी बाळगून आहे. आमदार नसतानाही एवढी प्रचंड गर्दी माझ्या एकसष्ठी सोहळ्याला झालीय, हीच माझी कमाई आहे.’’ सदाभाऊ सपकाळ यांचा मानपत्र, स्मृतिचिन्ह व शाल, श्रीफळ देऊन मंत्री शिंदे यांच्या हस्ते नागरी सत्कार करण्यात आला. पत्रकार शशिकांत गुरव यांनी मानपत्राचे वाचन केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com