श्री शिवाजी उदय मंडळाचा विजयादशमी कार्यक्रम रद्द

श्री शिवाजी उदय मंडळाचा विजयादशमी कार्यक्रम रद्द

सातारा ः येथील श्री शिवाजी उदय मंडळाच्या वतीने दर वर्षी आयोजित केला जाणारा विजयादशमी कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष बबनराव उथळे यांनी दिली.
 
श्री शिवाजी उदय मंडळाच्या वतीने दर वर्षी विजयादशमीला वर्धापनदिन कार्यक्रम व स्नेहमेळावा आयोजिला जातो. गेली 82 वर्षे हा कार्यक्रम अखंडपणे होत आहे.

पुणे- सातारा रस्ता जेसीबीने उखडणार; उदयनराजेंचा इशारा

मात्र, या वेळी कोरोनाच्या प्रादुर्भावाच्या संकटामुळे हा कार्यक्रम रद्द करण्यात आला. नागरिकांनी व क्रीडाप्रेमींनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन श्री. उथळे यांनी केले आहे.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com