
Shivendra Raje Bhosale : पालिका हद्दीतील कामांसाठी ६ कोटी ७० लाख
सातारा : आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या माध्यमातून सातारा पालिका हद्दीतील विविध प्रकारची ३८ विकासकामांसाठी नगर विकास विभागामार्फत ६ कोटी ७० लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.
उपलब्ध निधीतून प्रभाग दोनमधील जवान हौसिंग सोसायटी ते कसई गल्ली रस्त्यासाठी १९ लाख, सैनिकनगर बस स्टॉप ते कोयना सोसायटी रस्त्यासाठी १९ लाख, महेश कामठी घर ते युवराज पवार रस्त्यासाठी तसेच कामाठीपुरा सावित्रीबाई फुले उद्यानासाठी १६ लाख,
छत्रपती अभयसिंहराजे भोसले कमान ते संत गाडगे महाराज मठ ते मस्जिद अखेर रस्त्यासाठी १० लाख, प्रभाग एकमधील जय मल्हार सोसायटीअंतर्गत रस्त्यासाठी १० लाख, प्रभाग तीन पिरवाडी येथील अंतर्गत रस्त्यासाठी २५ लाख रुपयांचा निधी आहे.
प्रभाग २२ मध्ये सिमेंट काँक्रिट रस्ते, प्रभाग दोनमध्ये व्यायामशाळा, खेळणी तसेच हायमास्टसाठी २५ लाख, प्रभाग १९ मध्ये पॉवर हाउस ते वेताळ बाबा मठाजवळ गटार, संरक्षक भिंत, काँक्रिट पायऱ्यांसाठी ४७ लाख, मंगळवार पेठेतील त्रिगुणे चौक ते सुयोग मंगल कार्यालय रस्त्यासाठी १५ लाख, शाहूनगर साई कॉलनी प्रतापसिंह कॉलनी येथील अजिंक्यतारा रस्त्यासाठी १० लाख, साई कॉलनीतील अंतर्गत रस्त्यासाठी १० लाख,
प्रभाग १० शाहूपुरी चौक ते समता पार्क रस्त्यासाठी ३४ लाख, प्रभाग २१ गुरुवार बाग सुशोभीकरणासाठी १३ लाख, प्रभाग १० मधील शिवाजीनगर रस्त्यासाठी २८ लाख, देवी कॉलनीतील खुली जागा सुशोभीकरण, जिम साहित्यासाठी १५ लाख, गोडोलीतील जय शिवराय व्यायाम मंडळाच्या जिम साहित्यासाठी १० लाख, प्रभाग ८ तामजाईनगरमध्ये रस्ता, गटारसाठी १३ लाखांचा निधी मंजूर आहे.
गुरुवार बाग ते भावे बोळ, रेणुकामाता मंदिर गुजर बोळ रस्त्यासाठी ३३ लाख, शनिवार पेठ अतारवाडा बोळ पूल बांधणे १८ लाख, माची पेठ पुलासाठी १४ लाख, एलआयसी कॉलनीतील रस्त्यांसाठी १५ लाख, शाहूपुरीच्या जयविजय सोसायटीत बास्केटबॉल कोर्ट, वॉकिंग ट्रॅकसाठी २० लाख, दौलतनगर शिल्प अपार्टमेंट ते कॅनॉल रस्त्यासाठी २३ लाख,
गुरुवार पेठेतील समाजमंदिराच्या पहिल्या मजल्यासाठी २५ लाख, गडकर आळी ते धुमाळ आळी रस्त्यासाठी ३४ लाख, भैरोबा पायथा रस्त्यासाठी १० लाख, बुधवार पेठेतील प्रभाग ७ येथे काँक्रिट रस्ता, गटारसाठी २० लाख, रामराव पवार नगरमधील सभागृहासाठी २४ लाख, प्रभाग १७ मधील गोळीबार मैदान परिसरातील हायमास्टसाठी २५ लाख रुपये मंजूर झाले आहेत.
बापूजी साळुंखे नगरमधील रस्त्यांसाठी १७ लाख, सप्ततारा कॉलनीसाठी १५ लाख, अवी कॉलनीसाठी १० लाख, समर्थ मंदिर ते फुटका तलाव रस्त्यासाठी १४ लाख, शाहूपुरीच्या श्रीराम कॉलनीतील जागा सुशोभीकरणासाठी १४ लाख, सोमवार पेठेतील सभागृह कामासाठी २० लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे.