esakal | असं मरण्यापेक्षा जेलमध्ये बसलेलं बर; व्यापा-यांची भावना समजून घ्या : शिवेंद्रसिंहराजे
sakal

बोलून बातमी शोधा

असं मरण्यापेक्षा जेलमध्ये बसलेलं बर; व्यापा-यांची भावना समजून घ्या : शिवेंद्रसिंहराजे

सर्वांना विश्वासात घेऊन निर्णय झाल्यास काेणाची नाराजी राहत नाही. कार्यालयात बसून निर्णय घ्यायचा आणि ताे तातडीने राबवायचा हे चुकीचे आहे. जिल्हा प्रशासनाने निर्णयाचा फेरविचार करावा. मी स्वतः पालकमंत्र्यांशी चर्चा करुन व्यापा-यांची बाजू मांडणार असल्याचे आमदार शिवेंद्रसिंहराजेंनी स्पष्ट केले.

असं मरण्यापेक्षा जेलमध्ये बसलेलं बर; व्यापा-यांची भावना समजून घ्या : शिवेंद्रसिंहराजे

sakal_logo
By
सिद्धार्थ लाटकर

सातारा : जास्ती जास्त काय हाेणार 144 कलम याचा भंग हाेईल. गुन्हे दाखल हाेतील. धंदा बंद ठेवून, व्यवसाय बंद ठेवून मरण्यापेक्षा जेलमध्ये बसलेलं बरं अशी भावना व्यापा-यांची हाेईल. जिल्हा आणि राज्य शासनाने साेमवार ते शुक्रवार या कालावधीसाठीचा घेतलेल्या निर्णयाचा फेरविचार करावा असे आवाहन आमदार शिवेंद्रसिंहराजे भाेसले (Shivendraraje Bhosale) यांनी केले आहे. 

राज्य शासनाने आणि जिल्हा प्रशासनाने साेमवार ते शुक्रवार केवळ अत्यावश्यक सेवांची दुकाने सुरु ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्या विराेधात आज (मंगळवार) व्यापा-यांनी शहरात निदर्शने करुन दुकाने सुरु ठेवली आहेत. 

या व्यापा-यांचे म्हणणे आमदार शिवेंद्रसिंहराजे भाेसले यांनी एेकले. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले सगळा विचित्र कारभार आहे. इतर व्यवसाय सुरु ठेवत आहात. बांधकाम व्यवसाय सुरु ठेवला आहे आणि त्यासाठी लागणा-या गाेष्टी बंद ठेवल्या आहेत. बरं असे काही संशाेधन झाले आहे. का अत्यावश्यक सेवेतील दुकानात काेराेना हाेत नाही आणि कापड दुकानात हाेताे. व्यापा-यांचे म्हणणे आहे आम्हांला दिलेले नियम आम्ही पाळत हाेताे. नियमाचा भंग केल्यास जरुर आम्हांला दंड करा. या गाेष्टीला सर्व व्यापा-यांची मान्यता आहे. परंतु अचानक रात्रीत आदेश काढायाचा आणि वेठीस धरायचे हे याेग्य नाही. हा माेगलाईचा प्रकार झाला. सध्या राज्यातील व्यापारी थांबण्यास तयार नाहीत. शनिवारी आणि रविवार लाॅकडाऊनला व्यापा-यांची मान्यता आहे. सातारा जिल्हा आणि राज्य शासनाने व्यापा-यांच्या मागणीचा विचार करुन निर्णयाचा फेरविचार करावा. 

व्यापा-यांमुळे काेराेना हाेताे का? आम्ही दुकान सुरु ठेवणारच!

रस्त्यावरील व्यवसाय सुरु आणि दुकानांना बंदी हा नियम याेग्य नसल्याचे स्पष्ट करीत आमदार शिवेंद्रसिंहराजे म्हणाले ज्या गाेष्टींची आवश्यकता आहे त्या गाेष्टी सुरु ठेवल्या पाहिजेत. ज्या नकाेत त्या बंद ठेवा. एकदम निर्णय घेऊन व्यापारी आणि नागरिकांची कुचंबणा केली आहे. दहावी बारावीच्या विद्यार्थांना स्टेशनरीची आवश्यकता भासल्यास त्यांनी काेठे जायचे. जिल्हा प्रशासनाने व्यापारी संघटनांना बाेलावून त्यांच्या सूचना समजून घेऊन निर्णय घेणे आवश्यक आहे.
 
सर्वांना विश्वासात घेऊन निर्णय झाल्यास काेणाची नाराजी राहत नाही. कार्यालयात बसून निर्णय घ्यायचा आणि ताे तातडीने राबवायचा हे चुकीचे आहे. जिल्हा प्रशासनाने निर्णयाचा फेरविचार करावा. मी स्वतः पालकमंत्र्यांशी चर्चा करुन व्यापा-यांची बाजू मांडणार असल्याचे शिवेंद्रसिंहराजेंनी नमूद केले. 

बातमी कामाची! घरबसल्या जातीचे प्रमाणपत्र कसे मिळवाल?; जाणून घ्या संपूर्ण माहिती एका क्लिकवर 

loading image
go to top