esakal | Weekend Lockdown आम्ही तंतोतंत पाळू : शिवेंद्रसिंहराजे
sakal

बोलून बातमी शोधा

Weekend Lockdown आम्ही तंतोतंत पाळू : शिवेंद्रसिंहराजे

सरकारने बेड, रेमडेसिव्हिर आदींची काहीतरी व्यवस्था करायला हवी होती. मात्र, तसे काही झाले नाही. त्यामुळे त्यामध्ये थोडीफार ढिलाई झाल्याचे आमदार शिवेंद्रसिंहराजेंनी नमूद केले. 

Weekend Lockdown आम्ही तंतोतंत पाळू : शिवेंद्रसिंहराजे

sakal_logo
By
उमेश बांबरे

सातारा : कोरोनाबाधितांबाबत आताच्या स्थितीत संभाजी भिडे (Sambhaji Bhide) यांचे वक्तव्य पूर्णत: चुकीचे आहे, असे मत आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले (Shivendraraje Bhosale) यांनी केले आहे. दरम्यान, दोन दिवसांचा लॉकडाउन आम्ही तंतोतंत पाळू. कोरोना व्हायरस स्प्रेड होऊ नये म्हणून आम्ही आवश्‍यक ती काळजी घेऊ, असे सांगत वीकेंड लॉकडाउनचे समर्थन केले. 

भिडे यांनी मुळात कोरोना हा रोग नाही आणि ज्यांना कोरोना होतो ती माणसे जगायच्या लायकीची नाहीत. तो फक्त ... प्रवृत्तीच्या लोकांनाच होतो. तो एक मानसिक आजार आहे, असे वक्तव्य सांगली येथे केले होते. यासंदर्भात शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, ""त्यांनी तसे बोलणे चुकीचे आहे. कोरोना हा व्हायरस असून, तो कोणालाही होऊ शकतो. मात्र, त्यांनी अशाप्रकारचे वक्तव्य करणे योग्य नाही. शेवटी कोण शूर आहे आणि कोण ... आहे, हे त्या व्हायरसला माहीत नसते. आताच्या परिस्थितीत अशी वक्तव्ये करणे पूर्णत: चुकीचे आहे. कोरोना सर्वसामान्यांनाही होतो आहे आणि पैसेवाल्यांनाही होत आहे. यामध्ये अनेक जण दगावले आहेत. त्यामुळे कोरोनाबरोबर कोणी खेळ करू नये.'' 

राज्य सरकार कोरोना महामारीत अपयशी ठरले आहे का, या प्रश्नावर त्यांनी अधिक बोलणे टाळत कोरोना महामारीचा वेग कमी झाल्यानंतर सरकारने थोडी तयारी करून ठेवायला हवी होती, असे त्यांनी नमूद केले. ते म्हणाले, ""दुसरी लाट येणार याची कोणाला कल्पना नव्हती. मात्र, सरकारने बेड, रेमडेसिव्हिर आदींची काहीतरी व्यवस्था करायला हवी होती. मात्र, तसे काही झाले नाही. त्यामुळे त्यामध्ये थोडीफार ढिलाई झाली.'' 

लॉकडाउनबाबत तडकाफडकी निर्णय नको 

लॉकडाउनबाबत शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, ""दोन दिवसांचा लॉकडाउन आम्ही तंतोतंत पाळू. कोरोना व्हायरस स्प्रेड होऊ नये, म्हणून आम्ही आवश्‍यक ती काळजी घेत आहे. मात्र, काही गोष्टींचा विचार करायला हवा. सरसकट तीन आठवडे लॉकडाउन नसावा, अशी माझी भूमिका आहे. जिल्हा प्रशासन स्वत:हून काही निर्णय घेत नाही. राज्य सरकार सूचना करत आहे, त्याची अंमलबजावणी सुरू आहे. आम्ही सहकार्य करत आहे. मात्र, तडकाफडकी निर्णय घेऊ नये.''

काय म्हणाले उदयनराजे Uncut Video पहा

चिलीम आणि कोंबडीचं रक्त दिलं की धावजी पाटील प्रसन्न होताे...! 

मल्हारपेठेत शेतकऱ्यांवर कलिंगडे फेकून देण्याची वेळ; आठवडा बाजार बंदचा परिणाम

Edited By : Siddharth Latkar

loading image
go to top