esakal | शशिकांत शिंदे आणि मी एकच : शिवेंद्रसिंहराजे
sakal

बोलून बातमी शोधा

Shivendraraje Bhosale

छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, अहल्याबाई होळकर यांचा आदर्श घेऊन प्रत्येक सरपंचांनी आपल्या गावात पाणी आणि माती यांचे काम करावे.

शशिकांत शिंदे आणि मी एकच : शिवेंद्रसिंहराजे

sakal_logo
By
विजय सपकाळ

मेढा (जि. सातारा) : शशिकांत शिंदे, मानकुमरे आणि मी एकच आहे. त्यामुळे कोणाला कोणाकडे जाऊ दे. मात्र, गावांचा तालुक्‍याचा विकास करावा हाच उद्देश आहे. गरज असलेल्या महत्त्वाच्या गोष्टी कोणत्या आहेत. त्यास प्राधान्य देऊन प्रत्येक सरपंचांनी स्मशानभूमी, रस्ते व शेड आणि पाणंद रस्ते ही कामे हाती घ्यावीत, असे प्रतिपादन आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले. दरम्यान राजेंच्या वक्तव्याने उपस्थित आवक झाले.
 
सरपंच परिषदेच्या जावळी तालुक्‍याच्या वतीने नूतन सरपंच व कोरोना काळात कोरोना योद्धा म्हणून उल्लेखनीय काम केलेल्या सरपंचांच्या सत्कार समारंभात आमदार भोसले बोलत होते. या वेळी माजी आमदार सदाशिव सपकाळ, प्रदेशाध्यक्ष दत्ताभाऊ काकडे, एस. एस. पार्टे गुरुजी, जिल्हा परिषद सदस्य वसंतराव मानकुमरे, अर्चना रांजणे, सभापती जयश्री गिरी, अरुण कापसे, सरपंच परिषदेचे जिल्हाध्यक्ष नितीन पाटील, पश्‍चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष समाधान फोफळे आदी उपस्थित होते. 

आमदार भोसले म्हणाले, ""नूतन सरपंचांना विकासकामाची व अधिकाऱ्यांच्या कामाबाबत सखोल मार्गदर्शक पुस्तिका काढावी. जावळी तालुका हा राज्यात प्रत्येक अभियान राबविणारा तालुका आहे. त्यामुळे दारू दुकान मुक्त असणारा राज्यातील पहिला तालुका आहे. याच तालुक्‍यामध्ये आता महसूल विभागाच्या माध्यमातून पाणंद रस्ते खुले करण्याचे अभियान राबवूया. यासाठी आम्ही सर्वोत्तपरी सहकार्य करू. मी भाजपचा आमदार असलो, तरी विकासकामांना निधी कमी पडून दिला नाही. यापुढेही या शासनाकडून मोठा निधी मिळेल. त्यामुळे प्रत्येक गावचा विकास होण्यास मदत होईल. प्रत्येक सरपंचांना कोरोना प्रतिबंध लस प्राधान्याने दिली पाहिजे.''
 
दत्ताभाऊ काकडे म्हणाले, ""छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, अहल्याबाई होळकर यांचा आदर्श घेऊन प्रत्येक सरपंचांनी आपल्या गावात पाणी आणि माती यांचे काम करावे. शासनाने सरपंचांच्या मागण्यांकडे लक्ष देऊन त्यांचा आमदार शिवेंद्रसिंहराजेंनी पाठपुरावा करावा.''
 
वसंतराव मानकुमरे, समाधान फोफळे यांची भाषणे झाली. या वेळी संतोष केंजळे, विजय जाधव, संजय शेलाटकर, अजित मर्ढेकर, पुंडलिक पार्ट आदी उपस्थित होते. राजेंद्र जाधव यांनी प्रास्ताविक केले. सरपंच परिषदेचे तालुकाध्यक्ष बजीरंग चौधरी यांनी स्वागत केले. सरपंच सचिन दळवी यांनी आभार मानले. 

थोडं फार होणारच! उदयनराजेंनी गृहराज्यमंत्र्यांच्या भेटीनंतर सोडले मौन

राष्ट्रवादी काॅंग्रेसचे कट्टर असल्यानेच प्रश्न सुटेना

Edited By : Siddharth Latkar

loading image