esakal | पाकिस्तानात आज फडकणार भगवा; उदयनराजेही असणार उपस्थितीत
sakal

बोलून बातमी शोधा

पाकिस्तानात आज फडकणार भगवा; उदयनराजेही असणार उपस्थितीत

स्पर्धेतील विजेत्यांना छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, महात्मा जोतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर अशा महापुरुषांची चरित्रे भेट दिली जाणार आहेत.

पाकिस्तानात आज फडकणार भगवा; उदयनराजेही असणार उपस्थितीत

sakal_logo
By
दिलीपकुमार चिंचकर

सातारा : महाराष्ट्राप्रमाणेच यावर्षी पाकिस्तानमध्येही भगवा फडकणार असून, छत्रपती शिवरायांचा जयजयकार तेथील आसमंतात भरून राहणार आहे. कराचीत मराठी बांधव दणक्‍यात शिवजयंती साजरी करणार आहेत. आज (रविवार ता. 21) हा कार्यक्रम करण्यास तेथील शासनाने परवानगी दिली असून, ऑनलाइन होणाऱ्या या कार्यक्रमात खासदार उदयनराजे भोसले हेही सहभागी होणार आहेत. 

पाकिस्तानमध्ये पिढ्यान्‌ पिढ्या मराठी बांधव राहात आहेत. गायकवाड, भोसले, दुपटे, रजपूत, जगताप, अटकेकर अशी मराठी कुटुंबे कराचीत स्थायिक आहेत. तसेच एकूण पाकिस्तानमध्ये सुमारे 700 मराठी कुटुंबे पिढ्यान्‌ पिढ्या राहात आहेत. त्यांच्या मराठीवर उर्दुचा प्रभाव पडला आहे. या पिढीतील लहान मुलांना आणि मोठ्यांनाही मराठी भाषा शिकायची असल्याने येथील स्वप्न स्टडीजच्या माध्यमातून दिलीप पुराणिक आणि स्वप्निल पुराणिक हे मराठी भाषा ऑनलाइन शिकवितात. याबरोबरच आपला सारा इतिहासही त्यांना ज्ञात करतात. हे मराठी बांधव आता कराचीत शिवजयंती साजरी करणार आहेत. तेथील शासनाने रविवारी (ता.21) शिवजयंती साजरी करण्यास परवानगी दिली असल्याची माहिती दिलीप पुराणिक यांनी दिली.

महाराष्ट्र दंगलमुक्त अभियानाचे अध्यक्ष व थोर मुस्लिम विचारवंत शेख सुभान अली सायंकाळी पाच वाजता पाकिस्तानमधील मराठी बांधवांना छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास ऑनलाइन सांगणार आहेत. पाकिस्तानमधील हे मराठी बांधव प्रथमच छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाचा इतिहास ऐकणार आहेत. 

पाकिस्तानात साजरा होणार मराठी भाषा गौरव दिनही 

पाकिस्तानातील मराठी बांधव 28 फेब्रुवारीस मराठी भाषा गौरव दिन साजरा करणार आहेत. त्या निमित्त मराठी भाषा आणि संस्कृती संबंधित विविध स्पर्धा आयोजित केल्या आहेत. या स्पर्धेत अगदी आठ वर्षांच्या लहानग्यांपासून ज्येष्ठापर्यंतचे मराठी बांधव सहभागी होणार आहेत. मराठी गाणी, मराठी कथाकथन आणि महाराष्ट्रातील संत महात्म्यांवर मराठी भाषेतून वक्तृत्व स्पर्धा गौरवदिनी होणार आहेत. कराचीतील गणेश मठ मंदिर या ठिकाणी हा कार्यक्रम करण्यास परवानगी तेथील शासनाने दिली आहे. स्पर्धेतील विजेत्यांना छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, महात्मा जोतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर अशा महापुरुषांची चरित्रे भेट दिली जाणार आहेत.

थोडं फार होणारच! उदयनराजेंनी गृहराज्यमंत्र्यांच्या भेटीनंतर सोडले मौन

Feeling Proud : जवान गौरव ससाणेंनी दोन अतिरेक्‍यांना धाडले यमसदनी

जय शिवराय! सुर्वेंची तिसरी पिढी जपतेय मर्दानी खेळांची परंपरा

साता-यात पहिले पाढे पंचावन्न; उदयनराजेंची डाेकेदुखी वाढणार?

काय बाई सांगू, कसं गं सांगू.. मलाच माझी वाटे लाज!

Edited  By : Siddharth Latkar

loading image