esakal | 'अधिकारी मतदारसंघात माझी प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करीत आहेत' सेनेचे आमदार अधिवेशनात आक्रमक

बोलून बातमी शोधा

'अधिकारी मतदारसंघात माझी प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करीत आहेत' सेनेचे आमदार अधिवेशनात आक्रमक

आमदार महेश शिंदे यांनी विधानसभेत मांडलेल्या प्रस्तावावरून जिल्ह्यात चांगलीच चर्चा रंगली आहे. यासंदर्भात शासनाकडून काय निर्णय घेतला जात आहे, याकडे जिल्हावासीयांचे लक्ष लागून राहिले आहे.

'अधिकारी मतदारसंघात माझी प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करीत आहेत' सेनेचे आमदार अधिवेशनात आक्रमक

sakal_logo
By
राजेंद्र शिंदे

खटाव (जि. सातारा) : सातारा जिल्ह्यातील काही अधिकारी आपली लोकप्रतिनिधी म्हणून प्रतिमा मलिन करण्याचा हेतुपुरस्सर प्रयत्न करत असल्याचा मुद्दा अधिवेशनात मांडून संबंधित अधिकाऱ्यांविरुद्ध हक्कभंगाच्या ठरावाची मागणी खटाव-कोरेगाव मतदारसंघाचे आमदार महेश शिंदे यांनी केली. विधानसभा अध्यक्षांनी श्री. शिंदे यांनी मांडलेला प्रस्ताव तपासून त्यावर योग्य ती कारवाई करण्याची ग्वाही दिली.
 
मुंबई येथे सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आमदार शिंदे यांनी विधानसभा नियम 2072-73 अन्वये विशेष हक्कभंगाची सूचना मांडली. हक्कभंगाची सूचना मांडताना श्री. शिंदे यांनी माहिती दिली, की कोरेगाव मतदारसंघामध्ये 22 पुनर्वसित गावे आहेत. या गावाच्या ग्रामस्थांनी कोयना, धूम व कण्हेर धरणांमध्ये स्वतःच्या जमिनींचा त्याग केला आहे. तथापि, त्यांना इतरत्र जमिनीचे वाटप करताना मोठ्या प्रमाणात घोटाळे करण्यात येत आहेत. जिल्ह्यात 23 फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात एक बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला विधान परिषद सदस्यांसहित सर्व प्रांताधिकारी, तहसीलदारांसहित सर्व पदाधिकाऱ्यांना निमंत्रित करण्यात आलेले होते. माझ्या मतदारसंघातील या एका अत्यंत महत्त्वाच्या विषयांवर आयोजित बैठकीसंदर्भात मला पूर्णपणे अंधारात ठेवण्यात आले. माझ्याच मतदारसंघातील अशा अनेक महत्त्वाच्या धोरणात्मक निणर्यांच्या बैठकांसंदर्भात मला हेतुपुरस्सर डावलण्याच्या चुका जिल्हा प्रशासनाकडून मागेही झालेल्या आहेत व आताही होत आहेत. परिणामी जिल्ह्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी, निवासी उपजिल्हाधिकारी, सर्व प्रांताधिकारी वर्ग लोकप्रतिनिधी म्हणून माझी प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करत असल्याने संबंधित अधिकाऱ्यांविरुद्ध विशेष हक्कभंगाची सूचना मांडली आहे. विधानसभा अध्यक्षांनी आमदार शिंदे यांनी मांडलेल्या विशेष हक्कभंगाच्या प्रस्तावाबाबत तपास करून संबंधित अधिकाऱ्यांसंदर्भात योग्य तो निर्णय घेण्याची ग्वाही दिली. 

शासन निर्णयाकडे जिल्हावासीयांचे लक्ष 

दरम्यान, आमदार शिंदे यांनी विधानसभेत मांडलेल्या प्रस्तावावरून जिल्ह्यात चांगलीच चर्चा रंगली आहे. यासंदर्भात शासनाकडून काय निर्णय घेतला जात आहे, याकडे जिल्हावासीयांचे लक्ष लागून राहिले आहे.

भाजपच्या ताब्यातील साखर कारखान्यासाठी गोळाबेरीज सुरु; कॉंग्रेस-राष्ट्रवादीला सेनेच्या साथीची अपेक्षा

कानून के हाथ बहुत लंबे होते है! पुण्यातील कुख्यात गुंड गजा मारणेला साताऱ्यात अटक

जाहिरातबाजीमुळे पुसेगावची बाजारपेठ विद्रूप; अनधिकृत बॅनर्स, पोस्टर्सवर कारवाईची गरज

धक्कादायक! दहावीत शिकणाऱ्या मुलाच्या अभ्यासाच्या तणावातून आईची आत्महत्या

काय सांगता! पोटदुखीपासून वाचण्यासाठी 79 वर्षांचा आजोबा 31 वर्षांपासून खातोय चक्क मुरुमाचे खडे


Edited By : Siddharth Latkar