esakal | व्यापा-यांमुळे काेराेना हाेताे का? आम्ही दुकान सुरु ठेवणारच!
sakal

बोलून बातमी शोधा

व्यापा-यांमुळे काेराेना हाेताे का? आम्ही दुकान सुरु ठेवणारच!

ब्रेक द चेन' या स्लोगनखाली राज्यात कडक निर्बंध लागू झाले आहेत. राज्य सरकारच्या आदेशानुसार शनिवार व रविवार पूर्ण लॉकाडाऊन जाहीर करण्यात आला आहे. मात्र, सोमवारी रात्री अचानक जिल्हाधिकाऱ्यांनी सातारा जिल्ह्यासाठी 'कडक निर्बंधा'चा आदेश काढला आहे. त्याचा निषेध व्यापा-यांनी आज (मंगळवार) केला.

व्यापा-यांमुळे काेराेना हाेताे का? आम्ही दुकान सुरु ठेवणारच!

sakal_logo
By
सिद्धार्थ लाटकर

सातारा : राज्य सरकारने लागू केलेले साेमवार ते शुक्रवार या कालावधीतील लाॅकडाऊन साता-यातील व्यापा-यांना मान्य नसल्याचे आज (मंगळवार) त्यांनी शहरात एकत्रित येत स्पष्ट केले. काही दुकानदारांनी सातारा जिल्हाधिकारी यांनी साेमवारी रात्री अचानक काढलेल्या आदेशाबाबत नाराजी व्यक्त केली. काेराेनाचे नियम पाळून आम्ही व्यवसाय सुरु ठेवणार आहे. सरकारने आमच्या मागणीचा विचार करावा असे आवाहन व्यापा-यांनी केले आहे.

आगामी काळात लग्न सराई आहे. नागरिकांची गैरसाेय हाेऊ नये यासाठी आम्ही दुकानं सुरु केली आहेत. काेराेना हा व्यापा-यांमुळे हाेताे हा समज सरकारचा झाला आहे. सरकारने बार, रेस्टाॅरंट, आदी सुरु ठेवले आहे मग दुकाने का बंद असा सवाल व्यापा-यांनी केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी शनिवारी आणि रविवारी केलेला लाॅकडाऊन आम्ही मान्य केले. आमचा त्याबाबत सरकारला पाठींबा आहे. परंतु पुढचे 25 दिवस दुकान बंद ठेवणे आम्हांला मान्य नाही. 

हा निर्णय अन्यायकारक आहे. आगामी काळात सण आहेत. व्यापा-यांना फसवून निर्णय झाला आहे. बांधकाम सुरु ठेवा असे म्हणणा-या सरकारने हार्डवेअरची दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. कसं बांधकाम पुर्ण हाेणार. शासनाने केटरींग व्यवसायास देखील परवानगी नाकारली आहे. वर्षभर आमचे नुकसान झाले आता पुन्हा सरकाराने लाॅकाडऊन जाहीर करुन आमच्या जखमेवर मीठ चाेळण्याचा प्रयत्न केला आहे.  

सातारकरांनाे! कोरोना चाचणीपासून ते प्लाझ्मा मिळण्यापर्यंतची महत्वाची माहिती जाणून घ्या एका क्लिकवर 

"ब्रेक द चेन' या स्लोगनखाली राज्यात कडक निर्बंध लागू झाले आहेत. राज्य सरकारच्या आदेशानुसार शनिवार व रविवार पूर्ण लॉकाडाऊन जाहीर करण्यात आला आहे. मात्र, सोमवारी रात्री अचानक जिल्हाधिकाऱ्यांनी सातारा जिल्ह्यासाठी 'कडक निर्बंधा'चा आदेश काढला आहे. परंतू रात्री काढलेला आदेश ग्रामीण भागात पाेचला नाही. त्यामुळे कोणती दुकाने बंद राहणार आणि कोणती सुरू याबाबत संभ्रम राहिल्याने पुसेगाव बाजारपेठेतील बहुतांश व्यवसायिकांनी दुकाने सुरु ठेवली हाेती. त्यामुळे पुसेगाव बाजारपेठेत व्यवहार सुरळीत असल्याचे पहावयास मिळाले. दरम्यान खटाव, भुईंज येथे देखील दुकानदारांनी आपले व्यवसाय सुरु ठेवले आहेत.
 

loading image
go to top