esakal | कऱ्हाडात व्हेंटिलेटरचा तुटवडा, व्यापाऱ्याचा मृत्यू; नागरिक प्रशासनास जाब विचारणार
sakal

बोलून बातमी शोधा

कऱ्हाडात व्हेंटिलेटरचा तुटवडा, व्यापाऱ्याचा मृत्यू; नागरिक प्रशासनास जाब विचारणार

त्या भागातील नागरीक आज (गुरुवार) आमदार पृथ्वीराज चव्हाण, पालकमंत्री बाळासाहेब पाटील व जिल्हाधिकारी, प्रतांधिकारी यांना भेटणार आहेत. संबधित व्यापाऱ्याचे शवविच्छेदन आज (गुरुवार) होईल.

कऱ्हाडात व्हेंटिलेटरचा तुटवडा, व्यापाऱ्याचा मृत्यू; नागरिक प्रशासनास जाब विचारणार

sakal_logo
By
सचिन शिंदे

कऱ्हाड : केवळ व्हेंटिलेटर नसल्याने येथील भाजी मंडईतील व्यापाऱ्यास जीव गमवावा लागल्याची घटना कऱ्हाडात घडली आहे. संबधित व्यापारी कोरोनाबाधीत होते. त्यांना बुधवारी (ता.5) दुपारी एक वाजल्यापासून त्यांचे आप्तेष्ट रूग्णालयात दाखल करण्यासाठी फिरत होते. त्यांना धाप लागली होती. त्यामुळे व्हेंटिलेटरची गरज होती. त्यासाठी खासगी वाहनातून त्यांचे आप्तेष्ट त्यांना घेवून व्हेंटिलेटर्स आहेत त्या दवाखान्याचा शाेध घेत होते. मात्र प्रत्यक्षात त्यांना व्हेंटिलेटर  उपलब्ध होवू शकला नाही.
साताराच्या बातम्या वाचा 

कृष्णा, सह्याद्री व शारदा अशा तिन्ही हाॅस्पीटलला त्यांनी चकरा मारल्या मात्र बेड उपलब्ध नाही. व्हेंटिलेटर नाही, अशी उत्तरे दिली जात होती. सायंकाळी चार पासून त्यांना रूग्णवाहीकाही उपलब्ध झाली नाही. त्यांनी शासनाच्या 108 क्रमांकावर त्यांनी काॅल केला मात्र त्यांनी तो काॅल रिसिव्ह केला नाही. आप्तेष्ट संतापले होते. काहींनी सातारहून रूग्णवाहिका मागवली. ती रूग्णवाहीका सायंकाळी उपलब्ध झाली. त्यातून सातच्या सुमारास रूग्ण सातारा जिल्हा रूग्णालयात हलविण्यात आला. मात्र सातारच्या अलीकडेच पाच किलोमीटरवर त्या व्यापाऱ्याचे निधन झाले. त्याबाबत त्यांच्या आप्तेष्टांना माहिती देण्यात आल्यानंतर मंडई परिसरात वातावरण संतप्त होते.

आयएएस डॉ. अश्विनी वाकडेंच्या भावाला 'ती' गाेष्ट खटकली हाेती

किल्ले अजिंक्‍यतारा परिसरात दक्षिण दरवाज्याकडून जाणे टाळा 

त्या भागातील नागरीक आज (गुरुवार) आमदार पृथ्वीराज चव्हाण, पालकमंत्री बाळासाहेब पाटील व जिल्हाधिकारी, प्रतांधिकारी यांना भेटणार आहेत. संबधित व्यापाऱ्याचे शवविच्छेदन आज (गुरुवार) केले जाणार आहे. 

जाब विचारणार 

व्हेंटिलेटर व बेड न मिळाल्यामुळे कऱ्हाड शहरातील सहाव्या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. हे फार धक्कादायक आहे. नेमकं कोण चुकतंय याची चर्चा शहरात आहे. बरेच लोक काळजी घेऊन पण बाधित होत आहेत. मग शहरात होणारे मृत्यू कशामुळे होत आहेत. येथे तीन कोविड हॉस्पिटल असूनही व्हेंटिलेटर बेड न मिळाल्यामुळ मृत्यू होणे वाईट आहे अशी भावना नागरिकांची झाली आहे. या सगळ्याला ते सार काम प्रशासनाच आहे. याचा आज (गुरूवारी) जाब विचारण्यासाठी काही लोक शासकीय अधिकाऱ्यांकडे जाणार आहेत.

बदली बियाणे नको तर पैसे घ्या!, बियाणे महामंडळाने अदा केले 19.12 लाख -

Edited By : Siddharth Latkar

loading image
go to top