शेतकरीविरोधी कायदे रद्द करा; मसुरात मोदी सरकारविरोधात कॉंग्रेस आक्रमक

शेतकरीविरोधी कायदे रद्द करा; मसुरात मोदी सरकारविरोधात कॉंग्रेस आक्रमक

मसूर (जि. सातारा) : केंद्र सरकारने शेतकरी विरोधी केलेले काळे कायदे रद्द करावेत, यासाठी माजी मुख्यमंत्री, आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषदेच्या मसूर गटात शेतकरी व व्यापाऱ्यांच्या स्वाक्षरी मोहिमेचा प्रारंभ येथे जुन्या बस स्थानक चौकात करण्यात आला. 

केंद्र सरकारने शेतकरी विरोधी केलेल्या कायद्याविरोधात कॉंग्रेस आक्रमक झाली असून ठिकठिकाणी सरकारविरोधात आंदोलन केली जात आहेत. केंद्र सरकार शेतक-यांची गळचेपी करत असल्याचा आरोप कॉंग्रेसने केला असून हा काळा कायदा तत्काळ रद्द करण्याची मागणी केली आहे.

कॉंग्रेसचे जिल्हा सरचिटणीस नंदकुमार जगदाळे, अजितराव पाटील- चिखलीकर, जिल्हा परिषद सदस्य निवासराव थोरात, सुदाम दीक्षित, उमेशराव साळुंखे, शैलेश चव्हाण, अमित जाधव, विवेक चव्हाण, सावळाराम कांबळे, प्रशांत मोरे, संग्रामसिंह जगदाळे, लहुराज यादव, प्रशांत यादव, पांडुरंग झंजे, उदय पाटील, रवी थोरात, सुनील माळी, अंकुश भगत, दिनकरराव मोरे, राकेश पारवे, गणेश मोरे, विजय भांडवले, शकील शेख, किशोर पारवे, प्रदीप जैन यांसह कॉंग्रेसचे कार्यकर्ते, शेतकरी व व्यापारी उपस्थित होते. संग्रामसिंह जगदाळे यांनी स्वागत केले. प्रशांत मोरे यांनी आभार मानले. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com