सातारा जिल्ह्यात 384 कोरोनामुक्त,15 बाधितांचा मृत्यू, 728 नागरिकांचे नमुने तपासणीसाठी

सिद्धार्थ लाटकर
Tuesday, 1 September 2020

सातारा जिल्ह्यातील विविध ठिकाणच्या 15 नागरिकांचा कोरोनाने मृत्यू झाला असल्याने कोरोनाच्या मृत्यूंची संख्या चारशेपर्यंत गेली आहे.

सातारा : सातारा जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या मृत्यूचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून आजही 15 नागरिकांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. 384 नागरिकांना कोरोनामुक्त झाल्याने घरी सोडण्यात आले तर, 728 नागरिकांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. साेंवारी रात्री उशिरा आलेल्या अहवालानुसार जिल्ह्यातील ६६१ नागरिकांना कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले आहे. 

जिल्ह्यातील विविध ठिकाणच्या 15 नागरिकांचा कोरोनाने मृत्यू झाला असल्याने कोरोनाच्या मृत्यूंची संख्या चारशेपर्यंत गेली आहे. मृतांमध्ये जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या कडगाव (ता. पाटण) येथील 79 वर्षीय महिला, दुर्गापेठ (सातारा) येथील 70 वर्षीय पुरुष, राजापुरी (ता. खटाव) येथील 30 वर्षीय महिला, गुरुवार पेठ (सातारा) येथील 67 वर्षीय पुरुष, कवडेवाडी (ता. कोरेगाव) येथील 75 वर्षीय पुरुष, जावळे (ता. फलटण) येथील 58 वर्षीय महिला. तसेच कऱ्हाड येथील खासगी हॉस्पिटलमध्ये पाटण येथील 76 वर्षीय महिला, गोळेश्वर (ता. कऱ्हाड) येथील 55 वर्षीय पुरुष, पापर्डे (ता. पाटण) येथील 52 वर्षीय पुरुष, शनिवार पेठ (कऱ्हाड) येथील 57 वर्षीय महिला, सातारा येथील खासगी हॉस्पिटलमध्ये शिरवळ (ता. खंडाळा) येथील 64 वर्षीय पुरुष, डीसीएच म्हसवड येथे पुसेगाव (ता. खटाव) येथील 79 वर्षीय पुरुष, म्हसवड (ता. माण) येथील 58 वर्षीय पुरुष, पुसेसावळी (ता. खटाव) येथील 60 वर्षीय पुरुष, भाटकी (ता. माण) येथील 55 वर्षीय महिला यांचा समावेश आहे.

शेतीला कुंपण घालायच आहे ? हा आहे घरगुती उपाय 
 
बाधितांमध्ये कऱ्हाड - सोमवार पेठ 2, मंगळवार पेठ 1, बुधवार पेठ 3, शुक्रवार पेठ 1, शनिवार पेठ 11, रविवार पेठ 1, वाकाण रोड 1, कऱ्हाड हॉस्पिटल 3, कार्वे नाका 8, उपजिल्हा रुग्णालय 1, विद्यानगर 2, कोयना वसाहत 1, मसूर 2, पाल 1, कोपर्डे हवेली 3, मलकापूर 5, घारेवाडी 2, येवती 1, बनवडी 1, आगाशिवनगर 1, रेठरे बुद्रुक 3, वडोली निळेश्वर 1, शेरे 2, वारुंजी 1, येणपे 1, गोळेश्वर 1, गोटे 2, पार्ले 1, काले 2, करवडी 6, रुक्‍मिणीनगर 1, मल्हारपेठ 1, विरवडे 1, पाडळी केसे 1. 
सातारा - सोमवार पेठ 7, मंगळवार पेठ 2, बुधवार पेठ 1, गुरुवार पेठ 3, शुक्रवार पेठ 2, शनिवार पेठ 8, रविवार पेठ 5, शाहूपुरी 4, चाळकेवाडी 1, सैदापूर 3, करंजे 3, शाहूनगर 3, अतीत 1, पोलिस ऑफिसर्स क्वार्टर 1, खेड 4, बोरखळ 1, भवानी पेठ 1, सासपडे 1, यादोगोपाळ पेठ 1, कोडोली 3, सहकारनगर 1, सदरबझार 2, डबेवाडी 7, लिंब 3, गोवे 2, वडुथ 4, तामजाईनगर 2, सिव्हिल क्वार्टर 1, पोलिस मुख्यालय 2, वळसे 1, गोळीबार मैदान 1, सिटी पोलिस लाइन 1, सोनगाव तर्फ 1, अपशिंगे 6, नागठाणे 7, वर्ये 1, सिव्हिल कॉलनी संभाजीनगर 3, गोडोली 3, बोरगाव 1, श्रीनगर एमआयडीसी 4, गडकर आळी 1, नांदगाव 1, सूर्यवंशी कॉलनी 1, दिव्यनगरी 1, सातारा 7, हरेकृष्ण पॅराडाईज 1, एमआयडीसी 2, संगमनगर 2, वनवासवाडी 2, दुर्गापेठ 1, भरतगाव 1, महागाव 2, अंगापूर 1, गेंडामाळ 2, परळी 1, हमदाबाद 4. 

कोरोनाची करुण कहाणी; आता कशी करेल, गणराया त्यांचे साकडे पुरे?

पाटण - पाटण 2, दिवशी बुद्रुक 1, पीएचसी मोरगिरी 10. वाई - वाई 3, सोनगीरवाडी 3, उडतरे 5, बावधन 1, भोगाव 2, गितांजली हॉस्पिटल 1, जांब 1, शेंदुरजणे 1, शहाबाग 1, काळंगवाडी 9, यशवंतरनगर 1, धर्मपुरी पेठ 1, गणपती आळी 2, रविवार पेठ 4, सह्याद्रीनगर 1, रामडोह आळी 4, मुंगसेवाडी 1, ज्ञानदेवनगर 1, सदाशिवनगर 1, भुईंज 1, विरमाडे 1, ब्राह्मणशाही 1, पाचवड 2. कोरेगाव - सोनके 1, कोरेगाव 10, एकंबे 2, गोळेवाडी 1, मंगळापूर 2, कुमठे 6, जळगाव 2, भाकरवाडी 2, कठापूर 2, रहिमतपूर 1. महाबळेश्वर - पाचगणी 1, भिलार 2, गवळी मोहल्ला 5, नगरपालिका 6, दरे-कुंभरोशी 1, रांजणवाडी 1, एमआयडीसी 5, पोलिस स्टेशन 1. जावळी - जावळी 1, आंबेघर 14, गवडी 7, मेढा 1, बामणोली 1, भोगवली 1, आनेवाडी 2, हुमगाव 1. खंडाळा - शिरवळ 7, निंबोडी 4, पिसाळवाडी 1, पळशी 1, हराळी 1, खंडाळा 5, चोरडे 1, शिरवळ 1, मोरवे 1, बावडा 5, केसुर्डी 2, खेड 4. फलटण - विडणी 3, बिबी 1, जाधववाडी 1, मलठण 5, तरडगाव 7, बरड 3, शिंदेनगर 2, पिंप्रद 2, फलटण 5, सातफाटा 2, धुळदेव 2, राजाळे 1, शुक्रवार पेठ 1, तांबवे 1, झणझणे सासवड 1. खटाव - मायणी 8, कातरखटाव 10, चोराडे 1, राजापुरी 1, वडूज 2, सिध्देश्वर कुरोली 4, विसापूर 6, निढळ 1, पुसेगाव 11, खातगुण 1. माण - म्हसवड 1, दहिवडी 4, निमसोड 1, पांगारी 1, माळवाडी 1.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Six Hundred Seventy Citizens Tested Covid 19 Positive In Satara