सहा दुचाकी चोरणारा चोरटा गजाआड; कऱ्हाड पोलिसांची कामगिरी

दुचाकी चोरीचे प्रमाण वाढल्याने तालुका पोलिसांनी दुचाकी चोरट्यांवर विशेष नजर
दुचाकी
दुचाकीsakal

कऱ्हाड : दुचाकी चोरणाऱ्या एकास पोलिसांनी काल रात्री गजाआड केले. त्याच्याकडून चोरलेल्या सहा दुचाकी जप्त केल्या आहेत. जावेद दस्तगीर महाबरी (वय २७, रा. आटके) असे अटक केलेल्याचे नाव आहे. त्याने पाचवड फाटा, नारायणवाडी व कृष्णा रुग्णालयाच्या प्रवेशव्दारात लावलेल्या सहा दुचाकी चोरून विकल्याची कबुली दिली आहे.

हवालदार विकास सपकाळ यांच्या खबऱ्याकडून माहिती मिळल्याने या चोरट्याचा पर्दाफाश झाला. त्याच्याकडून अजूनही दुचाकी जप्त होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. दुचाकी चोरीचे प्रमाण वाढल्याने तालुका पोलिसांनी दुचाकी चोरट्यांवर विशेष नजर ठेवली होती. त्यात जावेद महाबरी याची माहिती हवालदार सपकाळ यांना मिळाली. त्यांनी जावेदवर नजर ठेवून त्याला अटक केली. त्याने तालुका पोलिस ठाण्याच्या हद्दीत नारायणवाडी, पाचवड फाटा येथून दुचाकी चोरल्याची माहिती दिली.

दुचाकी
ओबीसी आरक्षणाच्या सुधारित अध्यादेशावर राज्यपालांची स्वाक्षरी

चौकशी केल्यानंतर त्याने शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील मलकापुरातील कृष्णा हॉस्‍पिटल गेट समोरील वाहने चोरल्याची माहिती पोलिसांना दिली. महामार्गाच्या उड्डाण पुलाखाली पार्किंगमधून सहा दुचाकी त्याने चोरल्या आहेत. त्याची कबुलीही त्याने दिली आहे. पोलिस उपअधीक्षक रणजित पाटील, पोलिस निरीक्षक आनंदराव खोबरे यांच्या नेतृत्वाखाली फौजदार आर. एल. डांगे, सहायक फौजदार भाऊसाहेब तांदळे, हवालदार विकास सपकाळ, ज्ञानदेव राजे, सचिन गुरव, आशिष पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे. हवालदार सपकाळ तपास करीत आहेत.

पोलिस उपअधीक्षकांच्या आदेशाची अंमलबजावणी

पोलिस उपअधीक्षक डॉ. पाटील यांनी उपविभागात दुचाकी चोरीचे गुन्हे वाढले आहेत. त्याचा त्वरित तपास करावा, असे आदेश तालुक्यातील सर्व पोलिस ठाण्यांना दिले होते. त्यानुसार त्याची कार्यवाही तालुका पोलिसांनी तातडीने केली. सूचना आलेल्या दुसऱ्याच दिवशी दुचाकी चोरट्याच्या मुसक्या आवळल्या. त्यामुळे पोलिस दलाचेही कौतुक होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com